शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे खंडाळा विभाग – लोणावळा शहरच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रक्तदान

मावळ मराठा न्यूज़ खंडाला, १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे खंडाळा विभाग व आधार ब्लड सेंटर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ” रक्तदान शिबीर “रविवार दिनांक १३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०.०० ते‌ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले‌ होते .या रक्तदान शिबीराचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मावळ तालुका प्रमुख आशिष भाऊ ठोंबरे, लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, मावळ तालुका सल्लागार मारूती भाऊ खोले, उपशहरप्रमुख संजय भोईर, डाॅ चंपक जैन, डाॅ मकरंद शहापुरकर यांच्या हस्ते करण्यात आले.या रक्तदान शिबीरास प्रमुख उपस्थिती शिवसेना गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख महेश भाऊ केदारी यांनी आपली उपस्थिती लावलीरक्तदान शिबिराचे आयोजन माथाडी कामगार सेना मावळ तालुका अध्यक्ष, खंडाळा विभाग संघटक परेश बडेकर, खंडाळा विभागाचे उपशहरप्रमुख मनेष पवार, समन्वयक अशोक गवारणे, शाखाप्रमुख गणेश वाडकर, योगेश वाडकर,आदी पदाधिकारी शिवसैनिकांनी केलेया रक्तदान शिबीरास अनिकेत गायकवाड, जेष्ठ शिवसैनिक अनंता थोरात, प्रदिप कचरे, सुरेश गायकवाड, विशाल गायकवाड, संदिप पवार, किरण गायकवाड, योगेश वाडकर, नागेश संकपाळे, प्रमोद कदम, यश कदम, गोपीचंद सोनवणे, वसंत कदम,कुणाल भोईने, उपविभाग प्रमुख नितीन सोनवणे, प्रमोद देवकर, उपविभाग प्रमुख संतोष लांगे,कुंजन दळवी, प्रकाश गायकवाड, संतोष गायकवाड, दत्ता दळवी व खंडाळा विभागातील नागरीकांनी आपला‌ सहभाग नोंदविला.रक्तदान शिबीरामध्ये सहभागी प्रत्येक रक्तदात्यास आयोजकांच्या वतीने तिरंगा ध्वज, प्रशस्तीपत्र व एक छत्री भेट देण्यात आली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page