भुशी दुर्घटना -भुशी धरणाजवळील धबधब्यात ४ ते ५ पर्यटक मुले धरणात वाहून गेले असल्याचा अंदाज



मावळ मराठा न्युज -लोणावळा,दोन दिवस सततधार पाऊसाने आजच भुशी धरण ओव्हर फ्लो झाले आणि पर्यटकांनी वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर यायला सुरुवात केली असताना आजच मोठी दुर्घटना तिकडे घडली असून भुशी धरणाच्या मागील बाजूस असलेल्या एका धबधब्याच्या प्रवाहातून ४ ते ५ पर्यटक मुले धरणात वाहून गेले असल्याचा अंदाज वर्तवली जात आहे. सदर पर्यटकांचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या शिवदुर्ग रेसक्यू पथकाच्या मदतीने मृताना शोधण्याचे कार्य सुरु आहे. दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.भुशी धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे प्रवाहित होत सर्व धरणात येत असल्याने दुपारी १ तें दीड सकाळच्या सत्रात धरण परिसरात पर्यटनासाठी आलेले काही पर्यटक रेल्वेचे विश्रांती गृह असलेल्या भागात डोंगरातून वाहणाऱ्या धबधब्यातून वाहणाऱ्या प्रवाहात भिजण्याचा आनंद घेत होते. दरम्यान सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सदरचा धबधब्यातील पाणी वाढत होते, पाण्याच्या या प्रवाहामुळे चार ते पाच पर्यटक पाण्याच्या वेगाने धरणात वाहून गेले असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे अदयाप शोध कार्य सुरु आहे. लोणावळा शहरचे पोलीस पोलीस स्टेश्शन चे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्यासह त्यांची टीम तसेच लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू पथक, मावळ वन्य जीव रक्षक टीम व स्थानिक युवक यांनी सर्व पर्यटक हे हडपसर,वानवडी येथील सय्यदनगर भागातील आहेत. दोन जणांचे मृतदेह साडेचार वाजण्याच्या सुमारास सापडले असून तिघांचा शोध सुरू आहे.




