कोल्हापुरची रणरागिणी स्नेहल जाधव यांचा कोल्हापुर येथे ” राजमाता जिजामाता पुरस्कार २०२६” ने सन्मानित

मावळ मराठा न्युज-कोल्हापूर,दि.०७.०६.२०२६ कोल्हापुर येथे कागल तालुक्यातील कागल निढोरी रोड , भडगांव पाटी येथे माऊली हॉल मध्ये शासकीय मान्यताप्राप्त फाऊँडेशन , पैलवान सुभाषदादा पाटील युथ फाऊँडेशन महाराष्ट्र राज्य संचलित राष्ट्रीय पुरस्कार सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. पैलवान सुभाष दादा पाटील युथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य पिंपळगाव बुद्रुक तालुका कागल यांच्या वतीने सामाजिक कार्य, लेखन, वाचन , शैक्षणिक ,राजकीय,कला क्रीडा,साहित्य कृषी ,पर्यावरण,धार्मिक,सांस्कृतिक ,अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या कोल्हापूरच्या रणरागिणी सौ स्नेहल सीताराम जाधव यांना सर्वोच्च समजला जाणारा ” राजमाता जिजामाता पुरस्कार २०२६ ” हा राष्ट्रीय पुरस्कार सन्मानचिन्ह ,सन्मानपत्र व मानाचा फेटा देऊन बहाल करण्यात आला.यावेळी देशातील एकूण १५० जणांचा युथ फाउंडेशन मार्फत पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. पुरस्कार सन्मानिय प्रमुख पाहुणे ब्रॅंचपोस्ट मास्तर मा.रंगराव पाटील, हातकणंगले विधानसभेचे युवानेते मा.भास्कर शेटे , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष पैलवान अभिजित तापेकर , कोल्हापूर शिवसेनेचे शहराध्यक्ष मा. बंडा लोंढे ,पंचायत समितीच्या माजी सभापती तसेच कोल्हापूर जिल्हा महिला उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या मा.स्मिता राणी गुरव यांच्या शुभहस्ते पुरस्कार बहाल करण्यात आला.यावेळी मा. संजय गायकवाड अध्यक्ष हर्षल फाउंडेशन देवळा संचालक हर्ष सृष्टी ऑल मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज, मा. विजय पवार युवा उद्योजक शिक्षण क्षेत्र व कुणबी पाटील धुळे जिल्हा, मा. विकास खतकर युवा उद्योजक हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनी , मा. उत्तम भाऊ जाधव स्पार्टन बॉईज भुदरगड तालुका अध्यक्ष उपस्थित होते.यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवर , पुरस्कार्थिंचे नातेवाईक व नागरिकांनी भरपुर गर्दी केली होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मांगोरे सर यांनी केले तर सूत्रसंचालन अभिजीत माने सर यांनी केले व आभार व कार्यक्रम संपुर्ण पार पाडण्यासाठी पैलवान सुभाष दादा पाटील व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page