लोणावळा शहरात ७१ .३४ टक्के मतदान ; एकूण ४८ हजार ३७३ ३४ हजार ५११ मतदारांनी बजावला आपला मतदानाचा हक्क

मावळ मराठा न्यूज -लोणावळा,लोणावळा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ पार पडली. नुकत्याच पार पडलेल्या या चूरशीच्या निवडणुकीत ७१ .३४ टक्के मतदान झाले. ३४ हजार ५११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. लोणावळा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत अध्यक्ष पदाकरीता ७ उमेदवार नगरसेवक पदाकरीता ७८ उमेदवारांनी आपले नशीब अजमावले आहे. १३ प्रभागात ६३ मतदान केंद्रावर मतदान झाले. प्रभाग क्रमांक सहा मधील पाच क्रमांकाचे मतदान केंद्र व प्रभाग क्रमांक आठ येथील एक नंबरचे मतदान केंद्रावर मतदान यंत्र तांत्रिक कारणाने बंद पडले होते. प्रशासकीय यंत्रणेने या दोन्ही ठिकाणी भेट देऊन ही दोन्ही केंदे त्वरित सरू केली. लोणावळा शहर पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले होते. निवडणूक निर्णय अधिकारी अमिता तळेकर, सहाय्यक अशोक साबळे यांच्या नेतृत्वाखाली ही सर्व मतदान प्रक्रिया शांततेत आणि निर्वघ्न पार पडली.संपूर्ण महाराष्ट्रात नगरपरिषद निवडणूक दोन टप्प्यात होत असल्याने झालेल्या मतदानाचा निकाल हा २१ डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. दरम्यान प्रभाग क्रमांक ५ व प्रभाग क्रमांक १० मधील प्रत्येकी एक जागेचे मतदान देखील २० डिसेंबर होणार आहे.त्यामुळे उमेदवारांना अजुन दोन आठवड्याहून अधिक काळ निवडणूक निकालाची वाट पाहावी लागणार आहे. तसेच प्रशासन यंत्रणावर तोपर्यंत आचारसंहिता लागूच राहणार असल्याने आणि मतदान यंत्र सुरक्षेची काळजी घ्यावी लागणार असल्याने ताण हा असणार आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page