लोणावळा शहर पोलीस स्टेशनची अवैध दारु विक्रेत्यावर कारवाई, १५,०००/- रु. ची देशी,विदेशी दारु केली जप्त

मावळ मराठा न्यूज:- लोणावळा, आगामी नविन वर्षाचे अनुषंगाने लोणावळा शहर पोलीस स्टेशनकडुन अवैध दारु विक्री करणा-या दारू विकेल्यावर छापा टाकुन एकुणे १४,८२५/- रुपयांचा देशी विदेशी दारुचा साठा जप्त करण्यात आला. लोणावळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक्षक सिताराम डुबल यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरुन लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक राहुल लाड, सफौ/वाणी, पोहथा/म्हेत्रे, पोहवा/अबनाये, पोशि/ कुवर व पोलीस स्टाफ यांनी कुणेगाव ता. मावळ जि. पुणे येथील पिंकी अर्जुन हिलम रा. कातकरी वस्ती कुणेनामा ता. मावळ जि. पुणे हि तिच्या घराच्या मागे झाडाच्या आडोशाला दारु विक्री करीत असल्याची बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी छापा घालुन वरील किमतीचा देशी विदेशी दारु साठा जप्त करुन गुन्हा दाखल करण्यात आला.सदरची कामगीरी मा. अंकित गोयल साो पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण व अपर पोलीस अधिक्षक सती पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शना खाली सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांचे सुचना प्रमाणे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल, सपोनि राहुल लाड, सफी/वाणी पोहवा म्हेत्रे, पोहवा/अबनाये, पोशि/कुवर व पोलीस स्टाफ यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोहवा/अबनावे हे करीत आहेत.लोणावळा पोलीस स्टेशन हद्दीत नववर्षाचे स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात त्यावेळी ते मदाक पदार्थाचे सेवन करुन नाच गाणी धिंगाणा घालत असतात अशा पर्यटकांवर लक्ष ठेवुन त्यांचेवर कारवाई करणे करीता लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीत योग्य तो बंदोबस्त नेमण्यात आला असुन पोलीस स्टेशन हद्दीत येणा-या वाहनांची कसून तपासणी केली जाणार आहे जेणे करुन कोणीही अवैद्य दारु अगर मादक पदार्थाची वाहतुक करणार नाही तशी वाहतुक करताना कोणीही आढळून आल्यास त्यांचेवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे लोणावळा शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सीताराम डूबल यांचे कडुन कळविण्यात आले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page