नांगरगाव गुरु परिवारातर्फे वनविभागाला वृक्षरोपण साठी ६ हजार फळझाडे

मावळ मराठा न्युज – लोणावळा,पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपणाला प्रोत्साहन देण्यासाठी नांगरगाव गुरु परिवारातर्फे लोणावळ्यातील रॅडिसन हॉटेलच्या मागील वनक्षेत्रातील सुमारे ३ एकर जागेसाठी वनविभागाला तब्बल ६ हजार फळझाडे देण्यात आली.या उपक्रमाच्या वेळी गुरु परिवाराचे ज्येष्ठ चाफेकर गुरुजी, उषाजी पंडित, नंदकिशोर खंडेलवाल, गुलाबराव पाटील, रमेशजी तसेच गुरु परिवाराचे इतर सदस्य उपस्थित होते. वनविभागातर्फे सिद्धार्थजी व त्यांची टीम यावेळी उपस्थित होती. वृक्षसंवर्धनाचा हा उपक्रम केवळ वनक्षेत्रापुरता मर्यादित न ठेवता स्थानिक पातळीवरही राबविण्यात आला. याच कार्यक्रमात कुरवंडे गावातील तसेच शिवदुर्ग टीमचे सदस्य ओंकार पडवळ यांना ५१ फळझाडे देण्यात आली.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड आणि त्यानंतरचे वृक्षसंवर्धन आवश्यक आहे. या उद्देशाने गुरु परिवाराने घेतलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page