*गुरुंचा सन्मान अन् ज्ञानाची दहीहंडी; कलापिनीचा अनोखा उपक्रम*







मावळ मराठा न्युज -तळेगाव दाभाडे, कलापिनी मध्ये शिक्षक दिन तसेच गोकुळाष्टमीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजनाने झाली. यावेळी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या सौ. विजया विजयकुमार इनामदार प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.शिक्षक दिनाचे औचित्य साधून कलापिनीच्या प्रशिक्षिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बालभवनच्या आणि कुमारभवनच्या प्रशिक्षिका अनुक्रमे ज्योती ढमाले आणि प्राची गुप्ते यांनी मनोगत व्यक्त केले. कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे यांनीही मनोगत व्यक्त करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. लाऊडस्पीकर आरोग्याला किती हानिकारक आहेत हे त्यांनी समजावून सांगितले.प्रमुख पाहुण्या सौ. विजया इनामदार यांनी शिक्षक दिन साजरा करण्यामागील हेतू आणि शिक्षकांचे जीवनातील महत्त्व थोडक्यात सांगितले. दहीहंडी आणि पुस्तक हंडी हा एकत्रित उपक्रम ज्ञान आणि एकात्मता याचा अपूर्व संगम आहे असे विजया इनामदार यांनी सांगितलेतसेच त्यांनी लहान मुलांना एक सुंदर गोष्ट रंगवून सांगत त्यांच्याशी संवाद साधला.गोकुळाष्टमीनिमित्त कलापिनी बालभवनतर्फे पुस्तकांची दहीहंडी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, पुस्तकांशी त्यांची मैत्री वाढावी आणि ज्ञानाचा आनंद मिळावा, हा या उपक्रमामागील उद्देश होता.राधा आणि कृष्णच्या वेषातली लहान मुले खूपच गोड दिसत होती.कार्यक्रमास कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे,कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे, उपाध्यक्ष अशोक बकरे, बालभवन प्रमुख मधुवंती रानडे, कार्यकारिणी सदस्य लीना परगी , प्रशिक्षक, बालभवन-कुमारभुवन चे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली ठाकुरदेसाई ह्यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वाना रुचकर अशा प्रसादाचे वाटप करण्यात आले.



