पवनानगर येथे गाईच्या गोठयाजवळ आढळला नऊ फूटी नर जातीचा अजगर,वन्य जीव रक्षक संस्था मावळ यांनी त्याला सुरक्षित जंगलात सोडला

मावळ मराठा न्यूज़,पवनानगर, दिनांक २८/०८/२०२३ पवना नगर येथील काशिनाथ डोंगरे व संतोष घरदाळे यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थे चे सदस्य शत्रुघ्न रासनकर व रमेश कुमार यांना फोन केला की आंबेगाव येथील शेतकरी शिवाजी राजीवडे व त्यांचे सहकारी गाई च्या खाद्या साठी गवत कापत असताना यांच्या गाईच्या गोठ्याच्या जवळ ऐक भला मोठा साप आहे फोन येताच लगेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थे चे सदस्य शत्रूध्ना रासनकर व रमेश कुमार हे त्या ठिकाणी पोचले व साप कुठे आहे याची पहानी करत असता त्यांना त्या ठिकाणी ऐक मोठा अ जगर दिसला त्यांनी लगेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थे चे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांना याची माहिती दिली तसेच अध्यक्ष अनिल यशवंत आंद्रे यांनाही याची माहिती दिली व जवळच गाईचा गोठा असल्या मुळे त्या अजगरास पकडुन परत जंगलात सोडून देण्याचे ठरले अशी माहिती वन्यजीव रक्षक मावळ संस्थे चे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांना सांगितले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली गाईच्या गोठ्या जवळच्या अजगरास सुखरूप पकडुन परत जवळ च्या जंगलात सोडण्यात आले अ जगर हा नऊ (९) फुट लांब होता व नर जातीचा होता .त्या वेळी वन सेवक गफुर शेख,ईफान शेख,शभीर शेख,विशाल सुतार,वन्यजीव रक्षक मावळ संस्था चे निलेश संपतराव गराडे, अनिल यशवंत आंद्रे, प्रमोद ओव्हाळ, शत्रूध्ना रासनकर, रमेश कुमार, संतोष दहीभाते , सोमनाथ चौधरी,उमेश साळवे ,विनोद मोरे ,नागेश कदम,नयन कदम,सुरज शिंदे,रोहन ओव्हाळ उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page