*लोणावळा महाविद्यालयात जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा उत्साहात संपन्न*

*लोणावळा महाविद्यालयात जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा उत्साहात संपन्न*

*लोणावळा महाविद्यालयात जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा उत्साहात संपन्न*लोणावळा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती आणि लोणावळा महाविद्यालयाच्या यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय मुला-मुलींच्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.स्पर्धेचे उद्घाटन लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष मा. श्री. दत्तात्रय पाळेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या अशा स्पर्धांचे आयोजन यापुढेही महाविद्यालयात सातत्याने करण्यात येईल. खेळाडूंना आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी संस्था सदैव त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.संस्थेचे विश्वस्त श्री. विशाल पाडाळे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना शिस्त, चिकाटी आणि संयम या गुणांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच महाविद्यालयाचे माजी क्रीडा शिक्षक कै. दीपक तारे यांच्या स्मृती उजाळा दिला.या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील एकूण २० महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. मुलींच्या वजनी गटांतून १२ खेळाडू, तर मुलांच्या वजनी गटांतून ३० खेळाडू सहभागी झाले होते. दोन्ही गटांतील चॅम्पियनशिपचा मान वाघिरे महाविद्यालय, सासवड यांनी पटकावला.या प्रसंगी पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीच्या सचिव डॉ. शितल शेंडकर, डॉ. उमेश पानेरू, डॉ. सविता फाळके तसेच पुणे जिल्ह्यातील जवळपास २० महाविद्यालयांचे खेळाडू व क्रीडा संचालक उपस्थित होते. महाविद्यालय स्तरावरील आयोजकरीता प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पॉवरलिफ्टिंग रिव्होल्यूशन, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे क्रीडा संचालक तसेच महाविद्यालयाचे क्रीडा विभाग सहाय्यक तेजस भांगरे यांनी विशेष परिश्रम घेतले.याशिवाय महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. अशोक मते, श्री. उल्हास पाळेकर, श्री. विनोद होगले, श्री. प्रफुल पाळेकर जिमखाना विभागाचे श्री. आकाश गायकवाड, अनिकेत ढाकोळ, यश तारे, साहिल पवार, यज्ञ तारे, काव्या नांदवटे, विनायक वीर, वेदांत कुंभार, परितोष काळे, गणेश घोजगे व श्री. राहुल वाळंज आदींनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी महाविद्यालयाचे व आयोजकांचे कौतुक केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page