नांदेड सिटीत पांडुरंगनाथ महाराज जगताप चॅरिटेबल ट्रस्ट – मारणेवाडी या संस्थेत घडताहेत संगीत कलाकार


मावळ मराठा न्युज – नांदेडसिटी,पुणे,सध्याच्या शैक्षणिक स्पर्धेच्या युगात शालेय शिक्षणा बरोबर एखादी कला मुलांना अवगत असावी व भविष्यात पर्याय म्हणून त्याचा उपयोग व्हावा या उद्देशाने ब्र. श्री. स. पांडुरंगनाथ महाराज जगताप चॅरिटेबल ट्रस्ट – मारणेवाडी या संस्थेचे वतीने गायक, ह. भ. प. ऍड. विजयदादा जगताप यांनी मुलांना शा. गायन, तबला वादन, हार्मोनियम वादन, वं सुगमसंगीत गायन याचे मोफत वर्ग सुरु केले आत्ता पर्यंत १४ मुले मुली संगीत विशारद झाली असून त्यांना गुरुवर्य श्री. जानकीराम जी जगताप हे शिक्षण देत आहेत.
याच संस्थेची एक शाखा ६ वर्षा पूर्वी नांदेडसिटी येथे सुरु असून सुमारे ३० मुले येथे शिक्षण घेत आहेत २०२७ ला यातील ४ मुले विशारद होतील
यावर्षी काही मुलांना SSC बोर्डाच्या परीक्षेत कला गुण मिळाले आहेत वर्गात हार्मोनियम व शा. गायन सुगम संगीत सौ. रेणुका काळे या शिकवत असून संस्कार वर्गात संविधान, नागरीकर्तव्य भ. गीता पठण सामाजिक संस्कार या गोष्टी श्री. राधेशाम जगताप हे मुलांना शिकवतात संस्कार वर्गात आर्थिक दृष्टीने दुर्बल असणाऱ्या मुलांना, युनिफॉर्म देणे विद्यापीठाची परीक्षा फी भरणे इ. मदत नांदेड सिटीतील जेष्ठ नागरिकांचे वतींने सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रकाश गोरे काका श्री.मिलिंद दीक्षित काका वं कर्वेनगर येथील उद्योजक श्री. नारायण शिंदे हे मदत करत असतात संस्कारवर्गाला जागा वं दैनंदिन खर्च नांदेड गावातील श्री. निलेश दारवटकर हे करतात
सर्वं शिक्षण मोफत आहे त्यामुळे परिसरातील जास्तीत जास्त मुलांनी या संधीचा फायदा घ्यावा असे विचार व्यवस्थापक राधेशाम जगताप यांनी व्यक्त केले

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page