लोणावळा टपरी,पथारी व हातगाडी पंचायत संघटनेची बैठक संपन्न संघटना सर्व टपरीधारकांच्या पाठीशी; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची घोषणा






मावळ मराठा न्युज -लोणावळा, दि. २१ नोव्हेंबर २०२६ :सर्व टपरी, पथारी व हातगाडी पंचायत लोणावळा शहर संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक आज मॅकडोनाल्ड मॉल येथील सभागृहात पार पडली. राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या सूचनेनुसार, मार्गदर्शक श्री. वसंतराव काळोखे व लोणावळा शहराध्यक्ष श्री. गणेश गोपाळराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी लोणावळ्यातील सर्व टपरीधारकांनी कोणत्याही प्रकारे भयभीत होऊ नये. संघटना आपल्या सर्व टपरीधारकांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. तसेच कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले. मा. आमदार श्री. सुनील अण्णा शेळके, नगरसेवक, नगराध्यक्ष तसेच लोणावळा नगरपरिषद प्रशासन यांच्याशी संघटनेचे पदाधिकारी चर्चा करून टपरीधारकांच्या प्रश्नांवर सकारात्मक मार्ग काढतील, असे बैठकीत सांगण्यात आले.तसेच ज्या टपरीधारकांचे शेड, बोर्ड किंवा इतर साहित्य वाहतुकीस व रहदारीस अडथळा निर्माण करत असेल, त्यांनी स्वतःहून संबंधित साहित्य काढून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले.दरम्यान, संघटनेविरोधी कामकाज केल्याच्या कारणावरून श्री. रमेश म्हाळस्कर यांची सर्वानुमते ठराव करून संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे यापुढे त्यांचा संघटनेशी कोणताही संबंध राहणार नसल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.नवनियुक्त पदाधिकारीराष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या सूचनेनुसार, मार्गदर्शक श्री. वसंतराव काळोखे व शहराध्यक्ष श्री. गणेश गोपाळराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.- तालुका अध्यक्ष: श्री. भारत चिकणे- उपतालुकाध्यक्ष: श्री. बाबा ओव्हाळ- उपतालुकाध्यक्ष: श्री. जमीलभाई सय्यद- लोणावळा शहर सचिव: श्री. संदीप पोटफोडे- खजिनदार: श्री. आकाश परदेशी- उपाध्यक्ष: श्री. आनंद पुजारी, श्री. अशोक अण्णा कदम, श्री. रवींद्र चव्हाण, श्री. ताजुद्दीन शेख- सहसचिव: श्री. मनीष आंदेकर- सहखजिनदार: श्री. लक्ष्मण दाभाडेमहिला पदाधिकारी :- महिला अध्यक्षा: सौ. हिराबाई दळवी- खंडाळा विभाग अध्यक्षा: सौ. मुस्कान शेख- बाजार विभाग अध्यक्षा: सौ. अविषा जाधव- गवळीवाडा विभाग अध्यक्षा: सौ. स्वाती लोखंडे- गोडवली विभाग अध्यक्षा: सौ. अलका काळेइतर नियुक्त्या :- प्रसिद्धीप्रमुख: श्री. शकील बागवान- कायदेशीर सल्लागार: अॅड. चेतन औरंगेया बैठकीस लोणावळा नगरपरिषद पथविक्रेता समितीचे सदस्य व संघटनेचे मार्गदर्शक श्री. वसंतराव काळोखे, सुनील कुचेकर, सौ. निर्मला पांगारे, श्री. महादेव जगताप, श्री. नरेश खोंडगे, श्री. गणेश काळडोके तसेच संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने टपरी, पथारी व हातगाडीधारक उपस्थित होते.टपरीधारकांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटना एकजुटीने आणि ताकदीने लढा देईल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.



