किड्स पॅराडाईज स्कूलच्या तन्वी जपे व दिव्यांग गाडेकर यांना वजन गटात सुवर्णपदक

मावळ मराठा न्युज:-पिंपरी पुणे जिल्हा क्रीडा परिषद पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभाग, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये किड्स पँराडाईज स्कूल, काळे कॉलनी , चऱ्होली बु. मधील १४ वर्षा खालील तन्वी जपे हिने २४ किलो वजनगटात तर दिव्यांश गाडेकर याने ४२ किलो वजनगटात सुवर्ण पदक मिळविले.मागील झालेल्या शालेय जिल्हा स्तरीय खो खो स्पर्धे मध्ये वयोगट १७ वर्षा खालील मुले व १४ वर्षा खालील मुलींनी उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले व तसेच चेस या खेळा मध्ये गौरव जायभाये या विद्यार्थ्याने मोलाची कामगिरी केली जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धे मध्ये वैष्णवी खतरावत हिने २८ किलो वजन गटात रौप्य पदक मिळवले व १४ वर्षा खालील वयोगटात फूटबॉल स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती.अध्यक्ष अँड अनंत काळे, उपाध्यक्ष सौ कुंदा काळे, संचालक नवनाथ काळे, संचालक अँड सचिन काळे, , गुणवंत कामगार आण्णा जोगदंड आणि मुख्याध्यापिका सौ. स्वाती काळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांचा सन्मान करून क्रिडा शिक्षक याचा ही सन्मान करून त्यांचेही कौतुक केले पुढील विभागीय स्पर्धेसाठी  विद्यार्थी यांना शुभेच्छा दिल्या. क्रीडा शिक्षक  प्रशांत हराळ, संदेश साकोरे, प्रणव सकुंडे,तसेच समन्वयक पूजा काळे व ज्योती ढवळे यां सहशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनत घेतली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page