स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये लोणावळा नगरपरिषदेचा तिसरा क्रमांक,देशपातळीवर शहराचा कचराकुंडी मुक्त शहर म्हणून डंका


मावळ मराठा न्युज:-लोणावळा शहर देशात थंड हवेचे ठिकाण म्हणून तर प्रसिद्ध होतेच.परंतु सलग सहा वर्ष स्वछत सर्वेक्षण मध्ये आघाडीवर राहत देशपातळीवर आपला ठसा उमाटावला आहे.यात लोणावळाकर नागरिक,माजी नगरध्यक्षा सुरेखा जाधव श्रीधर पुजारी यांचे मोठे योगदान आहे.रात्रंदिवस स्वछता अभियानात आपला सहभाग नोंदवला आहे. रस्त्यावर फिरून घाण करणाऱ्यांना दंड आणि शिस्त लावली आहे त्यामुळे एक चांगली सवय लोणावळा कर आणि पर्यटकना देखील लावली त्यामुळे हे शक्य झाले आहे. नुकत्याच भारतमंडपम पार पडलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२३ स्पर्धेत मध्ये संपूर्ण भारत देशात लोणावळा शहरास १ लाख पेक्षा कमी लोकसंख्या असेलल्या तृतीय क्रमांक तर ५० हजार ते १ लाख लोकसंख्या असलेल्या गटात लोणावळा नगरपरिषदेने प्रथम क्रमांक प्राप्त केला यासोबतच या स्पर्धेत सातत्य राखत सलग सहाव्या वर्षी राष्ट्रीय पातळीवर आपले नामांकन टिकवून ठेवत लोणावळा नगरपरिषदेने पुरस्काराचा षटकार मारत दिल्लीत आपल्या नावाचा डंका वाजवला आहे.गुरूवारी दिल्लीत भारतमंडपम नवी दिल्ली येथे पार पडलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२३ स्पर्धेच्या पुरस्कार सोहळ्यात माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुरमु यांच्या शुभहस्ते आणि केंद्रीय नगर विकास मंत्री श्री. हरदीप सिंह पुरी , केंद्रीय नगरविकास राज्य मंत्री श्री कौशल किशोर यांच्या उपस्थितीत लोणावळा नगरपरिषदेला पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोणावळ्याचे तत्कालीन मुख्याधिकारी श्री पंडित पाटिल , विद्यमान मुख्याधिकारी श्री अशोक साबळे, जिल्हासहआयुक्त श्री. व्यंकटेशदुर्वास शहर समन्वयक श्री अक्षय पाटील यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्काराचा स्वीकार केला. याशिवाय लोणावळा शहरास कचरा मुक्त शहर या श्रेणीमध्ये ३ स्टार रेटिंग व वॅाटर प्लस देखील प्राप्त झाले आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये १ लाखां पेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांच्या श्रेणीत प्रथम क्रमांक सासवड नगरपरिषदेने तर द्वितीय छत्तीसगढ़ येथिल पाटन आणि तृतीय क्रमांक लोणावळा या नगरपरिषदांनी पटकावला. या सर्वात विशेष बाब म्हणजे सासवड व या नगरपरिषदेची लोकसंख्या ही ५० हजारच्या आतमध्ये तर पाटनची लोकसंख्या २५ हज़ार पेक्षा कमी असून लोणावळा नगरपरिषदेची लोकसंख्या ५० हजाराहून अधिक असून यात वर्षभरात या ठिकाणी येणाऱ्या लाखो पर्यटकांचा ही समावेश असतो. अशा परिस्थितीत लोणावळा नगरपरिषदेने सलग सहाव्या वर्षी हा पुरस्कार प्राप्त केला आहे. याचा आनंद लोणावळेकर नागरिक सोशल मीडियावर मोठ्या उत्साहात व्यक्त करीत आहे. हे नेत्रदीपक यश मिळविण्यात सर्व नगरपरिषदेच्या व नागरिकांच्या सांघिक कामगिरीचा महत्वाचा वाटा आहे. तत्कालीन मुख्याधिकारी पंडित पाटील व विद्यमान मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी सर्व नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी नगर परिषदेचे आजी माज़ी सर्व लोक प्रतिनिधी , सर्व माध्यम प्रतिनिधी व सर्व नागरिकांचे आभार मानले.




