आठ कोटीच्या थीम पार्कचा करार फक्त ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर,चार कोटींचा निधी मिळनूही केवळ उत्खनन



मावळ मराठा न्युज :-डेक्कन कॉलेजवर माजी विद्यार्थिनीचे भ्रष्टाचाराचे आरोप?आठ कोटीच्या नागपुरातील गोरेवाडा परिसरात असलेल्या ‘आर्कियोलॉजिकल थीम पार्क’च्या कामात भ्रष्टाचार केल्याचा माजी विद्यार्थ्यांनी केला होता आरोप.चार कोटींचा निधी मिळनूही केवळ उत्खनन केल्याचा आरोप माजी विद्यार्थिनीने केला आहे.न्यायालयाने दिले होते याबाबतच्या चौकशीचे आदेश.कॉलेजने सहा वर्षांनंतर ७५ हजार रूपयांची स्टॅम्प ड्यूटी भरल्याचे समोर आल्यावर येरवडा पोलिसांकडून चौकशी सुरू केली आहे. नागपूरातील गोरेवाडा परिसरात असलेल्या आर्कियोलाजिकल थीम पार्क’च्या कामात डेक्कन कॉलेज ऑफ आर्कियोलॉजीने भ्रष्टाचार केल्याचा आरोप या कॉलेजच्याच माजी विद्यार्थ्यांनी केला होता. त्याची दखल घेत पुण्यातील न्यायालयाने चौकशीचे आदेश दिल्यानंतर सुमारे दोन वर्षांनी येरवडा पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.येथील थीम पार्कचा करार फक्त ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करून आठ कोटीच्या कराराची स्टॅम्प ड्युटी बुडविली होती. आता डेक्कन कॉलेजने ७५ हजार रूपयांची स्टॅम्प ड्यूटी भरली आहे. त्यामुळे हा पुरावा पोलिसांना मिळाला असून त्याची चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभिषेक हरिदास यांनी ‘मावळ मराठा न्युज’ ला दिली.




