तळेगाव येथील संजीवनी मुलींचे वसतीगृहातील मुलींना छत्रपती शिवाजी महाराज व श्री.म्हसोबा मंदिराच्या प्रथम वर्धापनदिना निमित्त फळे व खाऊ वाटप

मावळ मराठा न्युज – तळेगाव,दिनांक १८ डिसेंबर बुधवार रोजी तळेगाव दाभाडे येथील संजीवनी मुलींचे वसतीगृहातील मुलींना छत्रपती शिवाजी महाराज व श्री.म्हसोबा मंदिराच्या प्रथम वर्धापनदिना निमित्त ओवळे गावातील श्री.म्हसोबा मित्र मंडळाच्या वतीने फळे व खाऊवाटप करण्यात आले .यावेळी ओवळे गावचे युवा उद्योजक पै.अक्षयभाऊ भालेराव, श्री.म्हसोबा मित्र मंडळाचे संस्थापक, शिवभक्त अजित भाऊ शिंदे व संजीवनी मुलींच्या वसतीगृहाच्या संचालिका आसावरी बुधवर मॅडम व मुलीं मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यावेळी मुलींनी खुप शिकावे व मोठे व्हावे.व देवांने जे आपल्याला दिले आहे.त्यातील थोडेसे इतरांना देण्याचा प्रयत्न करावा असे मत मनोगत अजित शिंदे यांनी व्यक्त केले. आणि आसावरी बुधवर मॅडम यांनी हा उपक्रम राबविल्याबद्दल श्री.म्हसोबा मित्र मंडळाचे मनापासून आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page