“संकल्प नशामुक्ती अभियान” अंतर्गत वडगाव मावळ पोलीसांकडुन १ ,०८ ,६४० / रुपये किमतीचे मुद्देमालासह ६ किलो ८७६ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त,२ आरोपींना अटक


मावळ मराठा न्युज :-वडगांव, पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक श्री मितेश घट्टे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांचे संकल्पनेतुन लोणावळा विभागामध्ये “संकल्प नशामुक्ती अभियान” राबविण्यात येत आहे.आज रोजी वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री कुमार कदम यांना मिळालेल्या गुप्ता बातमीनुसार त्यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे स्टाफसह मौजे टाकवे गावचे हद्दीत आरोपी नामे १) पोपट विठोबा जांभुळकर २) सोमनाथ पोपट जांभुळकर दोन्ही रा. टाकवे बु ता. मावळ, जि. पुणे. यांचे घरावर छापा मारुन त्याठिकाणाहुन आरोपी यांचेकडुन १,०८,६४० /- रुपये किमतीचे मुद्देमालासह ६ किलो ८७६ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करुन २ आरोपी यांना ताब्यात घेवुन अटक केलेले आहे.सदर कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक श्री मितेश घट्टे, लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री कुमार कदम, मपोउपनि ऋतुजा मोहिते, पोहवा/८२१ गायकवाड, पोहवा/४०० कसेबकर, पोहवा/१००८ सुपे, पोहवा/१३७ होले, पोना/२४१३ तावरे, पोशि/१०९९ कुंभार, पोशि/२४४९ पतुरे, यांनी केली. गुन्हयाचा पुढील तपास मपोउपनिरीक्षक ऋतुजा मोहिते ह्या करत आहेत.पोलीस निरीक्षक श्री. कुमार कदम यांनी सांगितले कि, यापुढेही “संकल्प नशामुक्ती अभियान” अंतर्गत सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यासाई कार्तीक यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई चालु ठेवणार आहोत.




