गोपाळराव तंतरपाळे यांचे नेतृत्वाखाली भिमशक्तीच्या वतीने प्राणांतिक उपोषण


मावळ मराठा न्यूज: – पुणे,गोपाळराव तंतरपाळे यांचे मुख्य नेतृत्वाखाली भिमशक्ती च्या वतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी साहेब पुणे यांचे कार्यालयावर दिनांक २५ -०५ -२०२३ गुरुवार दुपारी प्रचंड मोर्चा सह विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे आयोजन केले होते,परंतु आयुष्यमान संतोष पाटीलजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे बंडगार्डन पुणे शहर व श्री दिगंबर सूर्यवंशी पोलीस निरीक्षक गुन्हे देहूरोड पोलीस ठाणे यांनी मोर्चा न काढण्याची व शिष्टमंडळा द्वारे अधिकारांना निवेदन द्यावे अशी विनंती केल्या मुळे पूर्वनियोजित प्रचंड मोर्चा तूर्त स्थगित करून आंदोलन करते महिला, पुरुष यांचे सह महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्या जवळ पुणे स्टेशन येथे प्राणांतिक उपोषणास सुरुवात केली आहे,जो पर्यंत प्रलंबित सर्व मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत प्राणांतिक उपोषण करण्याचा निर्धार व्यक्त केला.




