महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहर कार्यकारिणी संपूर्णपणे बरखास्त,सुशीलकुमार पायगुडे यांची प्रभारी म्हणून निवड

मावळ मराठा न्युज – लोणावळा,महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहर कार्यकारिणी संपूर्णपणे बरखास्त करण्यात आली असून सध्या शहरप्रभारी म्हणून श्री. सुशीलकुमार पायगुडे यांची निवड करण्यात आली आहे. लोणावळा शहर व मावळ तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नोंद घ्यावी. तसेच विधानसभा निवडणूक प्रचारासंबंधी नियोजनाबाबत श्री. सुशील पायगुडे यांचेशी संपर्क करावा.असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुका अध्यक्ष रुपेश शंकर म्हाळसकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेना संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे आदेशानुसार आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पाठिंबा असलेले मावळ विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार उमेदवार आण्णा उर्फ बाप्पुसाहेब भेगडे यांना मावळ तालुका मनसेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे.आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करुन मावळ तालुक्यातील सर्व मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर सर्व संलग्न संघटना यानी निवडणूक काळात आपआपले कार्यक्षेत्रात अपक्ष उमेदवार बापु साहेब भेगडे यांचाच प्रचार करावा व त्यांना जास्तीत जास्त मताधिक्क्याने विजयी करण्याचा प्रयत्न करावा.पक्षाने दिलेल्या आदेशा व्यतिरिक्त इतर कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करु नये, असे निदर्शनास आल्यास सदर पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांनावर पक्षशिस्तभंगाची कारवाई केली जाईल. कृपया सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नोंद घ्यावी.असेही म्हाळसकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page