गोपाळकाला निमित्ताने डॉ.बी एन.पुरंदरे बहुविध विद्यालय शाळेत दहीहंडीचे आयोजन

मावळ मराठा न्युज :-लोणावळा,गोपाळकाला निमित्ताने डॉ.बी एन.पुरंदरे बहुविध विद्यालय प्राथमिक विभाग लोणावळा या शाळेत , शाळेतील बालगोपाळांसाठी दहीहंडी चे आयोजन करण्यात आले होते.प्राथमिक विभागाचे सर्व विद्यार्थी या सोहळ्यासाठी पारंपरिक वेशात उपस्थित होते.तर काही विद्यार्थी राधा कृष्ण बनून सोहळ्यात आनंदाने सहभागी झाले.दहीहंडीविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगण्यात आली. इयत्ता १ली च्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले आणि इयत्ता ४ थी च्या गोपाळांनी दहीहंडी फोडण्यासाठी थर केले व कृष्णाच्या वेशातील चिमुकल्याने दहीहंडी फोडली.शेवटी दहिपोह्याच्या प्रसाद व खाऊ वाटप करण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांनी सोहळ्याचा आनंद घेतला. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री आनंद गावडे आणि सर्व सहकारी शिक्षक यांनी या दहीहंडी सोहळ्याचे नियोजन केले होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page