*गुरुकुल विद्यालय लोणावळा येथे पर्यावरण पूरक शाडू मातीच्या गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा संपन्न*








मावळ मराठा न्युज -लोणावळा,गुरुकुल विद्यालय लोणावळा मराठी माध्यमाच्या वतीने दरवर्षी पर्यावरण पूरक शाडू मातीच्या गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित केली जाते. संस्थेचे अध्यक्ष श्री.दिनेश राणावत यांच्या प्रेरणेने ही स्पर्धा दरवर्षी घेतली जाते यावर्षी या स्पर्धेकरिता उद्घाटक म्हणून गुरुकुल विद्यालयाचे विश्वस्त,माजी मुख्याध्यापक श्री. बापूलाल तारे सर,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बयाजी खुरंगे ,पर्यवेक्षक -सुजित सूर्यवंशी , वरिष्ठ शिक्षक कुमार गरड सर व कौसर अरुलदास हे उपस्थित होते. याप्रसंगी सर्व मान्यवरांनी मुलांना स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.अध्यक्षीय भाषणात श्री. बापूलाल तारे म्हणाले की मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी असे अनेक उपक्रम आपल्या शाळेत राबवले जातात त्यात आपण सर्व मुलांनी सहभाग घेत चला .प्रसिद्ध शिल्पकार व आमचे शिक्षक कै. दत्तात्रय गुडीगार यांचा कलेचा वारसा बोंद्रे सर चालवत आहे याचा मला खूपच आनंद होत आहे. जवळपास इयत्ता ५ वी ते १० वी तील ८० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. शाळेचे कलाशिक्षक श्री . रमेश बोंद्रे यांनी या स्पर्धेचे संयोजक म्हणून कार्य पाहिले मुलांना शाडू मातीच्या गणपतीचे प्रात्यक्षिक करून दाखवले या स्पर्धेकरिता १२००, १००० , ७०० , ५०० , ३०० अशी अनुक्रमे रोख रक्कम स्वरूपात बक्षीसे विद्या विनय सभेकडून दिली जातात.. ही पारितोषिके मुलांनी रंगकाम पूर्ण केल्यानंतर दिली जातात. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अजय राठोड ,अथर्व गरुड ,सौ.मीनल पानसरे, दिनेश पाटील व दीपक मावकर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अथर्व गरुड यांनी केले उपस्थितांचे आभार दिनेश पाटील यांनी मानले.



