लोणावळा नगरपरिषद आणि आय एन एस शिवाजी यांच्या संयुक्त विद्यमाने १० डिसेंबरला बँड पथकच्या माध्यमातून देशभक्ती,शिस्तीचे होणार दर्शन


मावळ मराठा न्युज :- लोणावळा,लोणावळा नगर परिषद आणि आय एन एस शिवाजी नौसेना यांच्या संयुक्त विद्यमाने येथील पुरंदरे ग्राउंडवर दिनांक १० डिसेंवर रविवार रोजी सायंकाळी ६ वाजता आय एन एस शिवाजीचे अधिकारी यांचे बँड पथकच्या माध्यमातून देशभक्ती आणि त्यांच्या शिस्तीतून लोणावळ्यातील जवळपास २५ शाळाचे विद्यार्थी व त्यांचे पालक यांना देशभक्तीची आणि देशसेवेची प्रेरणा मिळावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यासाठी २० बाय ३० चे व्यासपीठ देखील तयार करण्यात येणार आहे यावेळी सर्वपक्षीय अध्यक्ष,माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव,लोणावळेकर आणि प्रतिष्ठित नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे नम्र आवाहन मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी केले आहे. आजच्या बदलत्या काळात देशाचे सैनिक होणे हें देखील विद्यार्थ्यांसाठी मोठे करियर असू शकते.सैनिकांची शिस्त आणि प्रामाणिक पणामुळे सैनिकांतून निवृत्त झाल्यावर देखील अनेक संधी त्यांना उपलब्ध होऊ शकतात,फक्त आय टी क्षेत्रातच करिअर नसून देशभक्ती सोबत चांगल्या अधिकारीची सुद्धा संधी यात असल्याचे साबळे यांनी सांगतिले.चांगल्या करिअर साठी शिस्त आणि प्रामाणिक पणाची शिस्ती तून विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना एक प्रेरणा मिळावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करीत असल्याचे साबळे यानी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.




