साहित्यिक पत्रकार बाबू डिसोजा यांना मानाचा अनुरव साहित्य गौरव पुरस्कार २०२६ जाहीर

मावळ मराठा न्युज -पुनावळे,दिनांक २३ ऑक्टोबर रोजी पिंपरी चिंचवड चेवरीष्ठ पत्रकार आणि ज्येष्ठ कवी बाबू डिसोजा यांना त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण सामाजिक जाणीवेतून केलेल्या निरपेक्ष सामाजिक कार्याची दखल घेऊन कर्तव्यप्रभेचा, सृजन प्रतिभेचा गौरव म्हणून कलानुरव कल्याणकारी सामाजिक संस्था आनंदनगर पुणे द्वारा अनुरव साहित्य कला, क्रीडा अकादमी चा स्व.लक्ष्मणराव कल्याणकर व स्व.गुंडेराव कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ “अनुरव साहित्य गौरव पुरस्कार २०२६ “जाहीर झाला असून तसे निवडपत्र संस्थेच्या अध्यक्षा मा.अनुजा कल्याणकर आणि सचिव मा.लता कुलकर्णी यांनी बाबू डिसोजा यांच्या पुनावळे निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम अकरा हजार,पुणेरी पगडी आणि शाल देऊन भव्य कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.पिंपरी चिंचवड च्या साहित्यिकांनी, साहित्य संस्थांनी त्यांचे फोनद्वारे तसेच भेटून अभिनंदन केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page