लोणावळा नगरपरिषदेत रिक्त जागेवर स्वछता निरीक्षकांची त्वरित नेमणूक करा-लोणावळा शहर शिवसेना



मावळ मराठा न्युज लोणावळा लोणावळा नागरिषदेने गेल्या पंचवार्षिक मध्ये स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा मध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनेक पुरस्कार मिळवले होते परंतु गेली दोन ते तीन वर्षांपासून शहरात अनेक ठिकाणी मुख्य रस्ता, चौक, मुख्य बाजारपेठ व रहिवाशी भागामध्ये कचऱ्याचे, घाणीचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे शहरात रोगराई चे प्रमाण वाढत आहे..या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आपण स्वच्छता निरीक्षक या पदावर गेली दोन तीन वर्षांपासून रिक्त जागेवर स्वछता निरीक्षकांची लवकरात नियुक्ती करावी अशा मागणीचे निवेदन आज लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री अशोक साबळे यांना आज देण्यात आले.निवेदन देताना शिवसेना लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर, उपशहर प्रमुख विशाल पाठारे, महिला आघाडी शहर संघटिका मनीषाताई भांगरे, शहर समन्व्यक नंदूभाऊ कडू, युवासेना शहर युवा अधिकारी विवेक भांगरे व सल्लागार पराग राणे उपस्थित होते.




