जिल्हापरिषद पुण्याच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाडयांच्या आशीर्वादाने २१ अनधिकृत शाळा सुरू,मंत्री दीपक केसरकर याबाबत गप्प का?

मावळ मराठा न्युज,पुणे (प्रतिनिधी) – राज्यात भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे शिक्षण व्यवस्था तळागाळा ला गेली आहे. एकीकडे राज्य सरकार अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याचे सोंग करीत आहे तर या उलट जिल्हापरिषद पुण्याचे अधिकारी हप्ते गोळा करत आहेत व स्वतःचे खिशे भरत आहेत. ज्या शाळा जिल्हापरिषद अधिकाऱ्यांना हप्ते देत नाहीत त्या शाळांना फक्त अनधिकृत चे लेबल अधिकारी लावत आहेत बहुतांश अनधिकृत शाळा ह्या राजकारणी मंडळीच्या व बहुतांश अधिकारी हेराजकारण्यांच्या ताटाखालील मांजर असल्याचे दिसून येते. एकीकडे विद्यार्थ्यांचे पालक लोन काढून शाळांच्या फी भरत आहेत तर दुसरीकडे संस्थाचालक कोणतीही परवानगी न घेता अधिकाऱ्यांच्या संगनमताने अनधिकृत संस्था चालवून विद्यार्थी व पालकांची फसवणूक करीत आहेत, आर्यन पब्लिक स्कुल (इयत्ता १ ली ते ४ थी), के, के, पब्लिक स्कुल (इयत्ता १ ली ते ४ थी) अनधिकृत शाळांनि शासन मान्यता न घेता शाळा चालवून अल्पवयीनविद्यार्थी, शैक्षणिक भवितव्य धोक्यात आणून, पालकांची आर्थिक व शैक्षणिक फसवणूक केली असल्याने सदर संस्थेवर तत्काळ कारवाई करणे बाबत तक्रारदार डॉ अभिषेक हरिदास व अभिजित खेडकर यांनी जिल्हा परिषद पुण्याच्या शिक्षणाधिकारी (प्राय) यांच्याकडे तक्रारी केल्या मात्र सदर तक्रारीवर जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी यांनी कोणतीही कारवाई केली नाहीं व या बाबत तक्रारदाराला कोणतीही माहिती दिली नाही.दीपक केसरकर यांनी कडक भूमिका घेणे गरजेचे -डॉ. अभिषेक हरिदासजिल्हा परिषदेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होताना दिसत नाही कदाचित ही लिंक मंत्र्या पर्यंत नाही ना? असा संशय जेष्ठ. सामाजिक कार्यकर्ते अनिल भांगरे यांनी केला आहे तर जिल्हापरिषद अधिकारी प्रत्येक अनधिकृत शाळेकडून लाखोंची वसुली करत असल्याने अनधिकृत शाळांवर कारवाई होत नाही असे मत आयु. सुनील पवार यांनी मांडले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page