कलापिनी संस्थेचा ४६ वा वर्धापनदिन,सुप्रसिद्ध नाट्य,सिने आणि मालिका कलाकार मंगेश कदम आणि लीना भागवत असणार आकर्षण



मावळ मराठा न्यूज,तळेगाव दाभाडे येथील कलापिनी संस्थेचा ४६ वा वर्धापनदिन सोमवार दि. १० एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ६.३० वाजता, कलापिनीच्या कै.डॉ,शं.वा पराजपे नाट्य संकुलात (कलापिनी सांस्कृतिक केंद्रात) आयोजित करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध नाट्य आणि लोकप्रिय मालिका कलाकार मंगेश कदम आणि लीना भागवत यांची प्रकट मुलाखत होणार आहे. याप्रसंगी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. याप्रसंगी कलापिनीच्या उभारणीत महत्त्वाचे योगदान असणारे संस्थेचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर, खजिनदार श्रीशैल गद्रे आणि सचिव हेमंत झेंडे यांचा षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त सत्कार तसेच कलापिनी गौरव पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. सर्व रसिक प्रेक्षकांनी अवश्य यावे असे आवाहन कलापिनीच्या कार्याध्यक्षा अंजली सह्स्त्रबुद्धे यांनी केले आहे .




