इंडियन मेडिकल असोसिएशन पीसीबीच्या अध्यक्षपदी डॉ सुशील मुथियान

मावळ मराठा न्यूज ,पिंपरी(प्रतिनिधी) इंडियन मेडिकल असोसएशनच्या पिंपरी चिंचवड भोसरी(पीसीबी) च्या अध्यक्षपदी डॉ सुशील मुथियान तर सचिवपदी डॉ अनिरुद्ध टोनगावकर यांची निवड करण्यात आली. बालेवाडी येथे संपन्न झालेल्या पदग्रहण सोहळ्यास आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शरदकुमार अगरवाल,उपाध्यक्ष डॉ जयेश लेले,उपाध्यक्ष डॉ शिवकुमार उत्तुरे,डॉ मंगेश पाटे,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ रवींद्र कुटे,मावळते अध्यक्ष डॉ विजय सातव, सचिव हेमंत पाटील,डॉ दिलीप कामत आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ अगरवाल यांनी राबवलेल्या “आओ गांव चले” या मोहिमेच्या अंतर्गत डॉ मुथियान यांनी मावळ येथील गोडूंब्रे हे गाव शैक्षणिक व वैद्यकीय सेवेकरीता दत्तक घेतल्याची माहिती दिली.वाचनालय उभारणी चे काम प्रथम करणार सरपंच निशा गणेश सावंत ह्या उपस्थित होत्या.नवीन कार्यकारी मंडळ पुढीलप्रमाणे- डॉ सुशील मुथियान – अध्यक्षडॉ अनिरुद्ध टोणगावकर – सचिवडॉ सुहास लुंकड – (सहसचिव)डॉ विकास मंडलेचा – (खजिनदार)डॉ माया भालेराव -(नियोजित अध्यक्ष)डॉ सुधीर भालेराव -डॉ.ललित धोका( दोघेही उपाध्यक्ष)

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page