हिंदुहृदयसम्राट,शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त लोणावळयात विविध कार्यक्रम


मावळ मराठा न्यूज़ :- लोणावला,हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे लोणावळा शहराच्या वतीने लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.बाळासाहेब यांचा प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले.स्मृतिदिनानिमित्त लोणावळा शहर व परिसरातील गरीब व गरजू लोकांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आलेसायंकाळी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यासाठी गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख महेश केदारी, शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष भाऊ ठोंबरे, लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, मा. नगरसेवक माणिक मराठे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस निखिल कविश्वर, उप तालुकाप्रमुख एकनाथ जांभूळकर, तालुका सल्लागार मारूती खोले, उप शहरप्रमुख संजय भोईर, उप शहरप्रमुख मनेष पवार, सल्लागार रामभाऊ थरकुडे, शिव वाहतूक सेनेचे पंकज खोले, मा कार्यालय प्रमुख अशोक बोंद्रे, प्रसिद्धी प्रमुख विजय आखाडे, विभाग प्रमुख रविंद्र टाकळकर, भगवान देशमुख, रतन मराठे, संजय शिंदे, उल्हास भांगरे, विभाग संघटक शेखर कारके, युवासेना उपतालुका अधिकारी अक्षय साबळे, कुसगावचे सरपंच ज्ञानेश्वर गुंड, उपसरपंच सुरज केदारी ,शाखाप्रमुख अमर बराटे, शाखाप्रमुख जितेंद्र ठोंबरे, शाखाप्रमुख संजय जाधव, धीरज घारे, शाखाप्रमुख आनंद साठे, शाखाप्रमुख प्रविण कदम, शाखाप्रमुख गणेश जाधव, विद्यार्थी सेनेचे राहुल साठे, उत्तम ठाकर, गणेश तिकोणे व लोणावळा शहरातील सर्व आजी माजी पदाधिकारी नगरसेवक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




