पर्यटन स्थळावरील होणाऱ्या दुघर्टना टाळण्यासाठी काढलेले आदेशाचे उल्लंघन करणा-या ७ जणांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई



मावळ मराठा न्युज:-लोणावळा,मा जिल्हा दंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये पुणे जिल्हातील पर्यटन स्थळावरील मावळ तालुक्यातील प्रामुख्याचे ठिकाणी पावसाळ्यातील पर्यटनासाठी येणारे नागरीकांचे सुरक्षिततेचे दृष्टीने व कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये याकरीता ता २/७/२०२४ ते दिनांक ३१/७/२०२४ रोजी पर्यन्त भुशी डॅम धरणे व गड किल्ले परिसर टायगर पॉईन्ट, लायंन्स पॉईन्ट, पवना धरण घुबड तलाव व इतर ठिकाणी सायकांळी ६ ते सकाळी ६ वाजताचे दरम्यान सदर ठिकाणी फिरण्यास मनाई करण्यात आलेबाबतचे आदेश पारीत केलेले आहेत. तसेच मा. श्री. पंकज देशमुख साहेब पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण तसेच मा. सत्यसाई कार्तीक सोा, सहा. पोलीस अधीक्षक, लोणावळा विभाग यांनी पोलीस ठाणे हद्दीत पर्यटनासाठी येणारे पर्यटकांचे सुरक्षिततेसाठी मा. जिल्हाधिकारी सोो पुणे यांनी काढलेल्या आदेशाची काटेकोरपणे पालन करणेबाबत व नियमांचे उल्लंघन करणारे इसमांवर कठोर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हददीमध्ये कोणताही अनुचित प्रकार होवु नये यासाठी सर्व पर्यटन स्थळांवर पोलीस बंदीस्त तैनात केलेला केलेला असताना देखील दि. २१/०७/२०२४ रोजी दुपारी दोन वाजण्याचे सुमारास मौजे आंबेगाव, ता. मावळ, जि. पुणे गावचे हद्दीतील धबधब्याचे धोकादायक प्रवाहामध्ये एकुण ५ जण हे बंदोबस्तास नेमण्यात आलेल्या पोलीस अंमलदारांची नजर चुकवून मौजे आंबेगावचे हद्दीतील धबधब्याचे प्रवाहामध्ये धोकादायक ठिकाणी जाण्यास प्रतिबंध असताना तसेच सदरबाबत तेथे फलक लावलेले असताना देखील त्यांनी सदर धोकादायक ठिकाणी जावुन, मा जिल्हा दंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे यांचे आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांचे विरूध्द लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दोन इसमांवर १) गु.र.नं. २३१/२०२४, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ प्रमाणे, व २) तीन इसमांवर गु.र.नं. २३२/२०२४, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.तसेच दि. २१/०७/२०२४ रोजी दुपारी १५.०० वाजण्याचे सुमारास मौजे भाजे गावचे हद्दीत, भाजे धबधबा, ता.मावळ, जि.पुणे येथे धबधब्याचे वरचे बाजुस प्रवाहामध्ये धोकादायक ठिकाणी जाण्यास प्रतिबंध, मनाई असताना तसेच सदर ठिकाणी तसे फलक लावणेत आलेले असताना देखील इसम ०२ इसम हे भाजे गावचे हद्दीतील भाजे धबधब्याचे वरचे बाजुस प्रवाहामध्ये धोकादायक ठिकाणी जावुन त्यांनी मा जिल्हा दंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे यांच आदेशाचे उल्लंघन केल्याने एका इसमावर १) गु.र.नं. २३३/२०२४, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ प्रमाणे, व २) एका इसमावर गु.र.नं. २३४/२०२४, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.लोणावळा व परिसरात सततधार पडत असल्या पावसामुळे नदी, नाले, धबधबे इ. ठिकाणी मोठ्या प्रमाणवर पाणी वाहत असून पर्यटकानी पाण्याचा अंदाज नसताना धरण क्षेत्र व धबधब्याचे पाण्यात प्रवेश करू नये, नशापान करू नये तसचे मा. जिल्हाधिकारी सोा, पुणे, मा. पंकज देशमुख सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण व मा. श्री. त्यसाई कार्तीक सोा, सहा. पोलीस अधीक्षक, लोणावळा विभाग यांनी दिलेल्या आदेशाचे व सुचनांचे पालन करून प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेतच पर्यटना आनंद घेणेबाबत आवाहन लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी केले आहे.




