९ ऑगस्ट २०२३ रोजी एकलव्य फौंडेशन,मनशक्ती केंद्र आणि डॉन बॉस्को लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी दिन साजरा

मावळ मराठा न्यूज़:- लोणावला, मनशक्ती केंद्र वरसोली येथे आदिवासी बांधवांसोबत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यामध्ये नवखंडेवाडी आणि वाकसाई चाळ येथील लहान मोठे १८० आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. अतिवृष्टीमुळे कर्जत येथील इर्शाळवाडी आणि आपल्या राजमाची येथील आदिवासी बांधव दुर्घटनेत दगावले त्यांना प्रथम श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रम सुरु करण्यात आला. हुतात्मा के नाग्या महादू कातकरी या क्रांतिकारकाचे प्रतिमेचे पूजन आदिवासी महिलेच्या हातून करण्यात आले त्यानंतर उपस्थित शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप केले तसेच आदिवासी बांधवांचे आरोग्य तपासणी केली गेली आणि नेत्र तपासणी देखील सर्व बांधवांची करण्यात आली.सर्व बांधवांसोबत स्नेहभोजन देखील लहान मोठ्या बांधवांसोबत करण्यात आले.यावेळी समाजिक कार्यकर्त्या सौ सोनाली शेळके, आदर्श क्लासेस चे संस्थापक श्री हरिविजय देशमुख, मार्गदर्शक श्री राजेशजी खंडेलवाल, मनशक्ती केंद्रातील सदस्य आणि एकलव्य फौंडेशन चे सुनिल पवार, अविनाश देसाई, ओंकार पवार, विकास धोत्रे, महादेव भवर, किरण विटेकर, प्रवीण देशमुख, किसन येवले, नरेश आहेर, पंडित येवले, रवी शेळके ई सदस्य उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page