लोणावळ्यात मोठी घरफोडी ;१४ लाख ५ हजार किंमतीचे दागिने आणि रोख लंपास






मावळ मराठा न्युज -लोणावळा-रात्री लक्ष्मीपूजन साठी ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम चोरट्याने लंपास केली आहे. दि. ०९/११/२०२६ रोजी पहाटे सकाळी पावणे सहा वाजता ते सकाळी ७ .३० वाजने चे दरम्यान निलम सुर्यकांत कदम फ्लॅट न.१०१, देवकीनंदन अपार्टमेंट, गवळीवाडा लोणावळा ता. मावळ जि.पुणे येथे घरफोडी झाली आहे. ६ ,४० ,००० /- रुपये कींमतीचे एक ८ तोळे वजनाचे सोन्याचे मनी मंगळसुत्र तिनपदरी पुढे सोन्याचे पेंडंट ओवलेले त्याचे मध्यभागी लाल रंगाचा खडा असलेले तसेच संपूर्ण मंगळसुत्र सोन्याचे चैनमध्ये ओवलेले प्रति तोळा ८० .००० रुपये ३ .६०,००० /-रुपये कीमतीचे ४ तोळे ५ ग्रॅमचा सोन्याचा राणीहार प्रति तोळा ८० ,००० रुपये ९६ ,००० /- रुपये किमतीचे एक 1 तोळे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे चोपर तीन पदरी असलेले व त्यामध्ये सोन्याचे पेडट असलेले प्रति तोळा ८० ,००० रुपये ७६००० /-रुपये किमतीचे एक ९ .५ ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे स्क्वेअर टोप प्रति तोळा ८० ,००० रुपये ५२ ,००० /-रूपये किमतीचे एक ६ .५ ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे सुईधागा टॉप प्रति ग्राम ८ ,००० रुपये २४ ,००० /-रुपये किमतीचे एक ३ ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे टॉप प्रति ग्रॅम ८ ,००० रुपये ७२ ,००० /- रुपये किमतीचे एक ९ ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे झुमके प्रति ग्रॅम ८ .००० रुपये ९६,००० /-रुपये किमतीचे एक १ तोळा २ ग्रॅम वजनाची गळ्यातील सोन्याची चैन प्रति तोळा ८० ,००० रुपये १ .२८ ,००० /- रुपये किमतीचे एक १ तोळा ६ ग्रॅम वजनाची गळ्यातील सोन्याची चैन प्रति तोळा ८० ,००० रुपये १ ,६० ,००० /- रुपये किमतीचे तीन सोन्याच्या अंगठ्या त्यापैकी एक १ तोळा वजनाची व बाकीच्या दोन प्रत्येकी अर्धा तोळा वजनाच्या अशा एकुण २ तोळे वजनाचे प्रति तोळा ८० ,००० रुपये २५,५०० /- रुपये रोख रक्कम त्यामध्ये ५०० रुपये दराची १ नोट, २०० रुपये दराच्या ५० नोटा १०० रुपये दराच्या १०० नोटा ५० रुपये दराच्या १०० नोटा अशी एकूण १४ ,०५ ,००० /- रुपयांची दि. ०९/११/२०२६ रोजी पहाटे सकाळी पावणे सहा वाजता ते सकाळी ७ .३० वाजने चे दरम्यान निलम सुर्यकांत कदम फ्लॅट न.१०१,देवकीनंदन अपार्टमेंट, गवळीवाडा लोणावळा ता. मावळ जि.पुणे येथे वरील वर्णनाची व किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्याने राहत्या घराची बाहेरुन लावलेली कडी कोणीतरी अज्ञात चोरट्याने उघडुन घरात अनाधिकाराने प्रवेश करून घराचे किचनमध्ये असलेल्या देव्हार्याचे समोर चौरंगावर ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम संमतीशिवाय, लबाडीचे इराद्याने अर्थिक फायदा करिता चोरी करून चोरून नेल्याची तक्रार दिली आहे.अज्ञात चोरट्याविरुध्द कायदेशीर फिर्याद आहे. गुन्हा दाखल केला आहे. गुन्हाचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली पो स ई चंदनशिव हे करीत आहेत दाखल अंमलदार पोहवा खोपडे/२४७५



