सकल मातंग समाज गोधडी बैठक चौथीमध्ये महीलांचा मोठा सहभाग, रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी

मावळ मराठा न्युज :-पिंपरी, प्रतिनिधी – सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य, पिंपरी चिंचवड शहराची गोधडी बैठक लोकशाहीर आण्णा भाऊ साठे समाज मंदिर,राज नगर सेक्टर नंबर २२ निगडी या ठिकाणी समाज बांधव रामेश्वर बावने व मयुर घोलप यांनी आयोजित केली होती.प्रास्ताविक माजी अध्यक्ष डी पी खंडाळे यांनी केले ते म्हणाले की,सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य, पिंपरी चिंचवड शहरात नव्याने तयार करण्यात आलेली समाजाची संघटना आहे,या माध्यमातून आपण समाजाचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद राहणार आहोत, प्रामुख्याने चंद्रकांत दादा लोंढे व युवराज दाखले यांच्या संकल्पनेतून शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे, सर्व समाज बांधवांनी एकत्र यावे असे अहवान करण्यात आले.यावेळी महीला भगिनी मनिषा क्षिरसागर, सत्यभामा साळुंखे,बेबी उदारे,कोमल साळवे,कलावती सोनवणे,मंगल जाधव यांनी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मत व्यक्त केले. तसेच विधवा महिलांसाठी पेंशन,व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून आर्थिक मदत मिळुन देण्याची विनंती केली.यावेळी सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य समन्वयक लोकसेवक युवराज दाखले व पिंपरी चिंचवड शहर जिल्हा समन्वयक चंद्रकांत दादा लोंढे यांनी सर्व प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद असल्याचे वचन दिले.या प्रसंगी माजी अध्यक्ष डी पी खंडाळे, कोंडीबा पाटोळे,मोहन दुबळे, प्रल्हाद दुबळे, रामेश्वर बावने, मयुर घोलप,मीरा अल्हाट, पुष्पा पुरी, सुनिता राजगुरू, सत्यभामा साळुंखे,हिरा बाई,घोलप,शिला कांबळे, गणेश कलवले, महादेव कांबळे,नाना कांबळे,शाम खुडे,संजय घोलप, जयश्री घोलप,उषा खुडे,छाया कांबळे,कलावती सोनवणे, रेणुका वडागळे,पुजा जगताप, मनिषा क्षिरसागर, जनाबाई गायकवाड,सुमन कांबळे,स्वाती कांबळे, सविता माई आव्हाड, लक्ष्मी घोलप, शिवाजीराव खडसे,करण गायकवाड,किरण गायकवाड,बेबी उदारे, रमाबाई कलाल, शिवाजी घोलप, संतोष उदारे व संगिता तांबवे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवाजीराव खडसे यांनी उपस्थित समाज बांधवांचे आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page