दहा दिवसात अनाधिकृत बांधकाम काढून घेण्याच्या आश्वसनानंतर कार्ला ग्रामस्थांचे उपोषण मागे

मावळ मराठा न्यूज:- कार्ला गावातील जमिन गट नं. १४८ मधील अनाधिकृत व बेकायदेशीर बांधकाम तात्काळ काढा या मागणीसाठी कार्ला ग्रामस्थांकडून काल पासून आमरण उपोषण सुरु करण्यात आले होते. तत्कालीन मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे व कार्ला ग्रामपंचायतीने सदरचे अनाधिकृत बांधकाम येत्या दहा दिवसाच्या आत काढून घेण्याची नोटीस दिल्यानंतर सदरचे उपोषण मागे घेण्यात आले. कार्ला ग्रामस्थ भाऊसाहेब हुलावळे, गणेश वायकर, समीर हुलावळे, अनिल हुलावळे, सुखदेव हुलावळे, योगेश हुलावळे, विनोद हुलावळे हे उपोषणास बसले होते. तहसिलदारांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना सरबत देऊन उपोषण सोडण्यात आले. उपरोक्त संदर्भिय विषयान्वये ग्रामपंचायत कार्ला मौजे कार्ला ता. मावळ, जि. पुणे यांसकडून प्रथम दर्शनीय केलेल्या चौकशी अन्वये सदरचे बांधकाम हे गट १४८ मध्ये असून शासनाच्या कोणत्याही संबंधित विभागाची परवानगी घेतलेली दिसून आलेली नाही त्यामुळे सदरचे बांधकाम हे बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न झाले. ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ५३ अन्वये १० दिवसाची अनधिकृत बांधकाम स्वतः हून काढणेची मुदतीची नोटिस आज दि.१२/०४/२०२३ रोजी ग्रा यांच्या मार्फत देत आहोत, तरी आपण आपले आमरण उपोषण मागे घ्यावे असे लेखी पत्र उपोषणकर्त्यांना तहसिलदार मधुसूधन बर्गे,गटविकास अधिकारी सुधीर भागवत,सरपंच दिपाली हुलावळे यांनी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद हुलावळे,माजी पंचायत समिती सदस्य दिपक हुलावळे,भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,ग्रामसेवक सुभाष धोत्रे,तलाठी मिरा बो-हाडे यांंच्यासह सामाजिक कार्यक्रते विष्णू हुलावळे,सतीश मोरे,विनोद हुलावळे,प्रसाद हुलावळे,अमोल हुलावळे,नंदकुमार सोंडेकर,सुनिल हुलावळे,बंटी हुलावळे ,विशाल हुलावळे,ज्ञानेश्वर हुलावळे,अतिश हुलावळे,गणेश हुलावळे,साई वायकर,धीरज हुलावळे यांंच्यासह कार्ला ग्रामस्थ उपस्थीत होते. दोन दिवसात कार्ला परिसरातील विविध ग्रामपंचायती, सरपंच, उपसरपंच, सदस्य, सर्व पक्षीय पदाधिकारी, बजरंग दल मावळ, विश्वहिंदू परिषद, हिंदू समिती लोणावळा शहर व ग्रामीण मावळ तालुका वारकरी संप्रदाय,मावळ तालुका अण्णा हजारे प्रणित भ्रष्ट्राचार विरोधी जन आंदोलन न्यास,लोणावळा शहर पत्रकार संघ यांच्यासह अनेकांनी उपोषणाला पाठिंबा दिल्याबद्ल उपोषणकर्त्यांनी सर्वांचे आभार मानण्यात आले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page