प्रा. श्री धनराज पाटील यांना श्री छत्रपती शिवराय विचार प्रेरणा राष्ट्रीय पुरस्कार


मावळ मराठा न्यूज़ दि.२० ऑगस्ट २०२३ रोजी कोल्हापूर येथील राज्यश्री शाहू स्मारक भवन दसरा चौक शिवराय कुशांबु ब्रिगेड व भगवा फाउंडेशन व इतर परिषदामार्फत प्रमुख वक्ते ॲड. कृष्णा पाटील, साहित्यिक विचारवंत ,तासगाव यांच्या हस्ते प्रमुख कार्यक्रमात प्रा. धनराज पाटील यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपल्या सर्वांच्या आदर्श रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समतावादी आणि मानवतावादी विचारांना आदर्श मानून आपल्या जीवनात कृती व व्यवहार आणि सामाजिक सलोखा जपत विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांच्या महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अशा व्यक्तींना सन्मानित करण्यात आले .यावेळी परिषदेचे अध्यक्ष मा. चंद्रकांत फडतरे,संस्थापक अध्यक्ष शिवराय ब्रिगेड कृष्णा पाटील ॲड. कृष्णा पाटील,साहित्यिक व विचारवंत तासगाव ॲड. मंचकराव डोणे, मा.अनिल म्हमाने,ॲड. करुणा विमल ,छाया पाटील,संयोजक इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने राज्यश्री शाहू महाराज स्मारक सभागृहामध्ये उपस्थित होते. छत्रपती शिवराय विचार प्रेरणा राष्ट्रीय पुरस्काराच्या सन्मानार्थ लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष मा.रमेशचंद्र नय्यर, सचिव दत्तात्रय पाळेकर,ॲड. नीलिमा खिरे ,उद्योजक नंदकुमार वाळंज ,विश्वस्त श्री दत्तात्रय येवले ,सीडीसी मेंबर ,श्री विशाल पाडाळे ,महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.विलास पाटील यांनी अभिनंदन केले.




