लोणावळा नगरपरिषद येथे शहर उपजीविका कृती आराखडा कार्यबल समितीची उद्बोधन मार्गदर्शन बैठक संपन्न

मावळ मराठा न्युज – लोणावळा, लोणावळा नगरपरिषद अंतर्गत दीनदयाळ जनआजीविका योजना(शहरी)पथदर्शी कार्यक्रम लोणावळा शहर उपजीविका कृती आराखडा कार्यबल समिती ची उद्बोधन मार्गदर्शन बैठक १५ एप्रिल, २०२५,मंगळवार रोजी लोणावळा नगरपरिषद येथे संपन्न झाली. यावेळी लोणावळा खंडाळा सिटीजन फोरमचे कार्यकारी सदस्य उदित शर्मा, उपाध्यक्ष कर्नल श्री सिन्हा,तसेच मीनाक्षी सिन्हा,लोणावळा खंडाळा इम्प्रूमेंट ट्रस्टचे श्री सुनील धुळेकर,कामगार विभागाचे अधिकारी श्री दीपक घोडके,कैवल्यधाम संस्थेचे श्री अशोक शर्मा, श्री बंडू कुटे अपीलचे श्री दत्तात्रय येवले,टाटा प्रॉपर्टी चे श्री विक्रांत बक्षी,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे,बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक राकेश कुमार,वलवण कॉलेज लोणावळ्याचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक रोहन वर्तक,अंगणवाडी सुपरवायझर फिरोजा शेख, पथमिक्रेता प्रतिनिधी सुजाता रमेश म्हाळसकर,शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी श्री अशोक पानसरे,हमाल पंचायतचे राजाराम साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.उप मुख्याधिकारी श्री शरद कुलकर्णी यांचे अध्यक्षते मध्ये सदर बैठक संपन्न झाली.यावेळी शहर अभियान व्यवस्थापक आणि शहर उपजीविका कृती आराखडा कार्यबल समितीचे नोडल अधिकारी श्री दिलीप गायकवाड यांनी सविस्तर माहिती दिली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page