वडगाव मावळ लिगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने महापुरूषांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा



मावळ मराठा न्यूज:- वडगाव ,गुरूवार दिनांक १३ एप्रिल, २०२३ वडगाव मावळ लिगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने वडगाव मावळ येथील न्यायालयाच्या बार रूममध्ये छत्रपती शिवाजी महाराज- महात्मा ज्योतिबा फुले- भगवान महावीर- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन उत्साहात करण्यात आले. महापुरूषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दिपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. या कार्यक्रमाला ॲड. एन. एस. दाभाडे, ॲड अशोक ढमाले, जेष्ठ वकील ॲड. एल.एम.कौशल, ॲड सिताराम बवरे, ॲड रंजना भोसले, ॲड गोयल, मा. अध्यक्ष ॲड धनंजय कोद्रे, असोसिएशनचे विदयमान अध्यक्ष ॲड दिपकजी चौधरी, ॲड एस. एम. मोरे, ॲड संतोष गुंजाळ, ॲड अजित वहिले आदींसह मोठ्या संख्येने वकील बंधु- भगिनी उपस्थित होते. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणामधून या सर्व महापुरूषांच्या महान कार्याविषयी माहिती दिली व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली. महामानव डॉ. आंबेडकरांचे भारतीय राज्यघटना बनवण्यातील अतुलनीय योगदान, दीन दलितांच्या उद्धारासाठी केलेले महत्वाचे कार्य, सामाजिक व आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न या त्यांच्या कार्याचे स्मरण यावेळी करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ॲड दीपकजी चौधरी, उपाध्यक्ष ॲड सोमनाथ पवळे, उपाध्यक्षा ॲड मिनाक्षी ढोरे, सचिव ॲड मोनालीताई कुलकर्णी- शेलार, सचिव ॲड राम शहाणे , खजिनदार ॲड प्रिया पंडीत, सदस्य ॲड प्रणोती पिंगळे, ॲड साक्षी मोरे, ॲड रोहिणी मुथा, ॲड प्रियांका शिंदे, ॲड मोझेस बनसोडे, ॲड प्रदिप ढोकर, ॲड अक्षय रौंधळ, ॲड प्रतिक देशमुख, ॲड अविनाश शिंदे, ॲड सागर शेटे यांसह अनेक वकील बंधु- भगिनींनी विशेष प्रयत्न केले.




