राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वैद्यकीय विद्यार्थी मेळाव्याला उस्फूर्त प्रतिसाद



मावळ मराठा न्युज:- पुणे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने वैद्यकीय विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन दुर्वांकुर कार्यालय धनकवडी पुणे या ठिकाणी करण्यात आले होते, याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खासदार मा. ना.वंदनाताई चव्हाण, डॉ. सुनील जगताप प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सेल, डॉ. शशिकांत कदम पुणे शहराध्यक्ष डॉक्टर सेल, डॉ. गणेश निंबाळकर मा. संघटक सचिव महाराष्ट्र राज्य डॉक्टर सेल , डॉ राहुल सूर्यवंशी, समन्वयक डॉक्टर सेल सामाजिक कार्यकर्त्या आश्र्विनी कदम उपस्थित होत्या, यावेळी वैद्यकीय विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न मांडण्यात आले,BAMS,BHMS, NURSING, LAB TECHNICIAN, MSW WORKERS यांच्या व्यावसायिक विविध समस्या जाणून घेऊन त्यावर योग्य ती उपाययोजना करण्याचे वक्त्यांनी आपल्या भाषणात जाहीर केले, याप्रसंगी वैद्यकीय व्यवसायातील 600हून अधिक सीनियर डॉक्टर्स आणि वैद्यकीय विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. याप्रसंगी अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आले, या कार्यक्रमात डॉ. न्यूटन भोसले यांची प्रदेश समन्वयक महाराष्ट्र राज्य वैद्यकीय विद्यार्थी संघटनेवर नियुक्ती करण्यात आली, या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. आशिष बारी, डॉ. नमित चिखले, डॉ. न्यूटन भोसले यांनी यशस्वीपणे केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रार्थना नगारे व डॉ. शौनक पारखी यांनी केले.




