महिला दिन रंगे,आनंद जेष्ठ नागरिक संगे

मावळ मराठा न्युज :-वाकड, पुणे-(प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर) दि १० मार्च रोजी आनंद जेष्ठ नागरिक संघ पोष्टल कॉलनी दत्त मंदिर रोड वाकड तर्फे महिला दिन उत्साहात साजरा झाला. दर महिन्याच्या मासिक मिटिंगमध्ये महिलादिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये सौ हेमांगी बोंडे यांनी आपल्या खुसखुशीत शैलीत महिलादिनी महिलांची पूर्वीची स्थिती आजच्या महिलांची स्थिती आणि वर्तनातील बदल,स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक,आजही असलेली महिला सक्षमीकरणाची गरज याचे विस्तृत विवेचन आपल्या समयोचित भाषणात केले.संघाचे सचिव श्री.सुरेश बोरकर,अध्यक्ष श्री.भागवत कोल्हे इत्यादी मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.तर श्री.देविदास निकुंभ सौ छाया निकुंभ यांनी महिला दिनाचे औचित्य साधून सुरेल गाण्यांची मेजवानी दिली.या प्रसंगी ज्यांचे वाढदिवस होते त्यांचाही सत्कार करण्यात आला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page