तळेगाव येथे विठ्ठल मंदिरात संत शिरोमणी सावता महाराजांची पुण्यतिथी उत्साहात संपन्न

मावळ मराठा न्यूज़ ,तळेगाव :- संत शिरोमणी सावता माळी विठ्ठल मंदिर ट्रस्टने महाराजांच्या पुण्यतिथीच अतिशय उत्कृष्ट असं आयोजन केलं होतं.कीर्तनकार ह भ प किरण महाराजांनी सादर केलेल्या सुश्राव्य संतवाणीने सकाळी ११ वाजता मंदिरात सुरुवात झाली त्यामुळे मंदिराच्या सभागृहातील संपूर्ण वातावरणच भक्तीमय झाले होते. हरिभक्त परायण किरण महाराज यांनी संत शिरोमणी सावता महाराजांचा जीवनपट आपल्या सुश्राव्य कीर्तनातून उलगडून सादर केला. तळेगावातील ज्येष्ठ डॉ.शालिग्राम भंडारींनी उपस्थित भाविकांशी संवाद साधत ग्रंथ वाचल्याशिवाय संत समजत नाही आणि संत समजल्या शिवाय भगवंत भेटत नाही, एकदा का संतांची कृपा आपल्यावर झाली की आपली सर्व जीवनशैलीच बदलून जाते, आपल्या हातून कधीच कुठलंही दुष्कर्म घडू शकत नाही म्हणून नवीन पिढीवर उत्तम संस्कार घडवायचे असतील तर माळी समाजासारखेच असे कार्यक्रम इतर समाजांनीही सामाजिक परिवर्तन आणि प्रगतीसाठी घेणे अत्यंत आवश्यक आहेत. माळी समाज हे सर्व विचारपूर्वक सातत्याने करीत आहेत त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. लायन्स क्लब तळेगावचे माजी अध्यक्ष दीपक बाळसराफ यांनी हा समारंभ यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी ज्या ज्या व्यक्तींचे सहाय्य झाले त्यां त्या व्यक्तींचा यशोचित सन्मान त्यांनी केला याबरोबरच उत्कृष्ट सूत्रसंचालन दीपक बाळ सराफ यांनी केले. या मंदिराच्या वास्तू उभारणीत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे आपली सक्रिय आयुष्याची ९१ वर्ष यशस्वीपणे पूर्ण करून संपूर्ण कार्यक्रमाची उंचीही त्या मा नगराध्यक्ष बाळासाहेब जांभुळकरचा यथोचित सत्कार डॉ. शालिग्राम भंडारी यांच्या हस्ते करण्यात आला.मृदुंगमणी हरिभक्त परायण अमित महाराज आणि चि. पार्थ भूमकर यांनी मृदुंग कलेत विशेष प्राविण्य संपादन केल्याने त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. मा प्राचार्य दत्तात्रय बाळसराफ सौ स्नेहल बाळसराफ यांच्याबरोबरच माळी समाजातील आपापल्या क्षेत्रात विलक्षण उंचीवर असलेल्या मान्यवरांचीही उपस्थिती या समारंभास होती. माळी समाजातील जवळजवळ ४०० भाविक यावेळी उपस्थित होते.भाविकांनी महाप्रसादाच्या भोजनाचा आनंद घेतला. हा संपूर्ण समारंभ यशस्वी करण्यास संस्थेचे.संत शिरोमणी सावता माळी विठ्ठल मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त स्वातंत्र्य सैनिक श्री बाळासाहेब जांभुळकर अध्यक्ष- श्री सचिन जाधव, उपाध्यक्ष श्री प्रभाकर ओंकार, सचिव श्री राहुल वचकलखजिनदार- श्री दिलीप आरु, अन्य ट्रस्टी लायन दीपक बाळासराफ,श्री मच्छिंद्र वैद्र्य, श्री ज्ञानेश्वर वचकल,श्री राजेंद्र जांभुळकर, रोहिदास जांभुळकर,डॉ. संतोष जमदाडे, श्री अमित वैद्य,श्री कुमार आगरकर,श्री विजय फुले यांनी विशेष परिश्रम घेतलेत.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page