दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना कलाविभूषण पुरस्कार जाहीर

मावळ मराठा न्यूज ,पिंपरी(प्रतिनिधी) पिंपरी चिंचवड कल्चरल फौंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा कलाविभूषण पुरस्कार यंदा चित्रपट दिग्दर्शक अभिनेता नागराज मंजुळे यांना प्रदान केला जाणार असल्याची घोषणा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजय भिसे यांनी नुकताच केली आहे.रोख रक्कम ५१ हजार रुपये ,सन्मान चिन्ह आणि शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी आमदार आश्विनीताई जगताप यांच्या शुभहस्ते आणि माजी आमदार विलास लांडे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १ मे २०२३ रोजी पिंपळे गुरव- नवी सांगवी येथील निळू फुले नाट्यगृहात दुपारी १२ ते ३ या वेळात कार्यक्रम संपन्न होईल.पुरस्कारानंतर श्री नागराज मंजुळे यांच्यासोबत विजय भिसे हे दिलखुलास जाहीर संवाद साधणार आहे.तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष विजय भिसे यांनी केले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page