छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती मानवी हक्क संरक्षण जागृतीच्या वतीने आभिवादनाने साजरी



मावळ मराठा न्युज :-चिंचवड,अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत ,महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू ,१८ पगड जाती धर्मांना एकत्र करणारे, मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले जीवन अर्पण करणारे, स्वाभिमानाचे प्रतीक, इतिहासाच्या पानावर ,रयतेच्या मनावर ,मातीच्या काणावर राज्य करणारा राजा छत्रपती यांना मानाचा मुजरा करून करून पुष्पहार अर्पण करून महाराजांची ३९४ जयंती माननीय हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने करण्यात आली. यावेळी जोगदंड यांनी उपस्थितांना सांगितले की महाराजाचा जन्म.१९ फेफ्रुवारी १६३० शिवनेरीवर किल्ल्यावर झाला.१८७० ला समाजसुधारक महात्मा फुले यांनी प्रथम शिवजयंती साजरी केलीपण १८९५ मध्ये लोकमान्य टिळक यांनी उत्सव सुरू केला. शिवाजी महाराज उत्कृष्ट संघटन कौशल्य असणारे न्याय शिस्त प्रिय राजे होते अशी महाराजांची विषयी माहिती देण्यात आली. लांडेवाडीतील भव्य अशा स्मारकास आभिवादन करून शिवजयंती साजरी करण्यात आली.एकच राजा शिवाजी राजा म्हणत, घोषणा देऊन परीसर दणणदुन सोडला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी ,पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, नितीन काळे, दीपक काळे, हनुमंत शेळके, प्रशांत पाटील, प्रकाश सावंत, सुनील धुमाळ राहुल वाघमारे ,राहुल काकडे ,इत्यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.




