शरद पवार यांनी २४ जानेवारीला बैठक,राष्ट्रवादीत महत्वाच्या मुद्यांवर चर्चा आणि निर्णय होणार

मावळ मराठा न्यूज :- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक मुंबईत येत्या २४ जानेवारीला बोलावली आहे. पवारांनी स्वतः ही बैठक घोषित केल्याने या बैठकीत विविध महत्वाच्या मुद्यांवर चर्चा होऊन निर्णय घेतले जाण्याचे बोलले जातेय. बैठकीतले संभाव्य मुद्दे: -पाच विधानपरिषदेच्या उमेदवारी आणि पाठिंब्यावर चर्चा -आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका -सध्याची राजकीय परस्थिती.. -पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक आणि संभाव्य उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना.मविआ बाबत पक्षाचे धोरण,नेते,कारकर्त्यांना विविध निवडुणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षावाढीसाठी मार्गदर्शन आणि सूचना आदी बाबींवर चर्चा होऊ शकते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page