दिवाळीनिमित्त गड किल्ले स्पर्धेतील तोरणा किल्ल्याचा अतिशय देखणा उद्घघाटन सोहळा संपन्न



मावळ मराठा न्यूज़ ,तळेगाव :- कडोलकर कॉलनी स्थित लायन्स क्लब तळेगावचे क्रीडांगण येथे सोहळा संपन्न झाला , या कार्यक्रमाचे विद्यमान लायन अध्यक्ष डॉक्टर अनिकेत काळोखे अध्यक्ष होते.उद्घघाटक इतिहासाचे गाढे अभ्यासक प्रा प्रमोद बोराडे सर आणि प्रमुख पाहुणे होते ज्येष्ठ लेखक लायन डॉक्टर शालिग्राम भंडारी उपस्थित होते. उपस्थितांच स्वागत करताना या सोहळ्याचे अध्यक्ष डॉक्टर अनिकेत काळोखे यांनी स्पर्धेतील कोणत्याही किल्ल्याची प्रतिकृती करताना त्या टीमला किल्ल्याचा स्थळासहित पूर्व इतिहास आणि किल्ल्याची व्याप्ती आणि महती याची संपूर्ण माहिती मिळवणे हे अतिशय कष्टाचे आणि जिकरीचे काम असते या संपूर्ण कसोटीवर चि युवराज बाळासाहेब पारगे आणि त्याची सर्व टीम शंभर टक्के यशस्वी झाली आहे याचा आम्हा सर्व लायन परिवाराला सार्थ अभिमान आहे.तोरणा किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती तयार करणारा युवराज पारगे याने प्रास्ताविक केले. त्यात तो म्हणाला की या किल्ले स्पर्धेतील माझे पिताश्री बाळासाहेब हे माझे प्रेरणास्थान असून हे माझं या क्षेत्रातील अकराव वर्ष आहे. मुरुड जंजिरा, पन्हाळा, पुरंदर, सिंहगड, रायगड ,लोहगड, देवगिरी ,दौलताबाद राजगड आणि आता तोरणा आतापर्यंत या गड किल्ल्यांची प्रतिकृती यशस्वीपणे केलेली आहे. जवळजवळ सात ते आठ वेळा या स्पर्धेत पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. उद्घघाटक प्राध्यापक प्रमोद बोराडे यांनी शिवकालीन छत्रपतींच आर्थिक स्वसंरक्षक आणि सामाजिक व्यवस्थापन हे सर्व मुद्दे अत्यंत अभ्यासपूर्ण ओघवत्या शैलीत सादर केलेत. गडकिल्ल्यांच्या निर्मितीची छत्रपतींची संकल्पना बोराडे यांनी समर्पक उदाहरणासहित स्पष्ट केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे डॉक्टर शाळीग्राम भंडारीनी आपलं मनोगत व्यक्त करताना सर्वप्रथम युवराज आणि त्याच्या टीमच मनःपूर्वक अभिनंदन केलं. गडकिल्ले प्रतिकृती स्पर्धा ही प्रतिकूल परिस्थितीत तरुणाईला मार्गदर्शक ठरणारी अशी स्पर्धा आहे हा आपला संदेश स्पष्ट करताना डॉक्टरांनी छत्रपतींच्या आयुष्यातील निश्चितच चमत्कार वाटतील अशा अत्यंत रोमहर्षक तीन प्रसंगाचा प्रामुख्याने उल्लेख केला तो म्हणजे अफजलखानाचा वध,पन्हाळगडचा वेढा आणि आग्र्याहून सुटका. या तीनही संकट समयी छत्रपती आपल्या कौशल्यपूर्ण कृतिशीलतेतून कसे यशस्वी झालेत हा सर्वांचाच अभ्यासाचा विषय ठरेल असे डॉक्टरांनी सांगितले. ” छत्रपती- दि मॅनेजमेंट गुरु” या अर्थाने संपूर्ण जग छत्रपतींना संबोधत त्याचं कारणही हेच आहे. त्यानंतर अर्णव काळोखे याने छत्रपती शिवाजी महाराजांच एक गाण गायल व रुद्रप्रताप बोराडे याने शिवगर्जना दिली.या अत्यंत देखण्या उद्घघाटन समारंभास प्रामुख्याने– लायन नंदकुमार काळोखे, लायन खजिनदार प्रकाश पटेल ,लायन सेक्रेटरी सुचित्रा चौधरी ,लायन शेखर चौधरी , लायन प्रमिला वाळुंज ,लायन भरत पोतदार, लायन सुनील वाळुंज ,लायन श्रीकांत लोमटे ,लायन विनीत चिटणीस लायन महेश भाई शहा, सौभाग्यवती प्रिया बोराडे मॅडम,आणि योग साधक श्री विठ्ठल गोंधळेकर ,श्री विश्वनाथ काळोखे, श्री विनायक हेंद्रे आणि श्री विजय शिंपी हे उपस्थित होते. या अत्यंत सुन्दर समारंभाच सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक श्री अनिल धर्माधिकारी यांनी अतिशय उत्कृष्टपणे सादर केल्याने या सोहळ्याची उंची वाढली.राष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन खेळणाऱ्या आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या युवराजशी औपचारिक संवाद साधताना तो म्हणाला की हा किल्ला उभारणीस लायन एडवोकेट मनोहर दाभाडे यांनी सहाय्य केले म्हणून त्यांचा शतशः ऋणी आहे.त्याबरोबरच या किल्ल्याच्या निर्मितीस सहाय्यभूत असणारे वेदांत देशमुख ,समर्थ पवार, श्रेयस हंबीर, युवराज काळोखे, रजवीर काळोखे ,ऋग्वेद संकपाळ आणि चिन्मय ढाकुलकर यां सर्वांनी अत्यंत मोलाचं सहाय्य केलं.




