रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी सुर्यकांत वाघमारे यांची नियुक्ती – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले



मावळ मराठा न्युज :-मुंबई, दि. ६ रिपब्लिकन पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीरित्या पुर्ण केल्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि लोणावळयाचे माजी नगराध्यक्ष सुर्यकांत वाघमारे यांना रिपब्लिकन पक्षाने पदोन्नती दिली असुन रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी सुर्यकांत वाघमारे यांची अधिकृत निवड करण्यात आल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी दिली. रिपब्लिकन पक्षाचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश सचिव सुर्यकांत वाघमारे यांचे रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजा सरवदे, राज्य कार्याध्यक्ष बाबुराव कदम, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी अभिनंदन केले आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाचा रिपब्लिकन पक्षाने ठरवुन दिलेला कारकिर्दीचा कालावधी पुर्ण झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा देवुन पक्षाचा आदेश पाळण्याचा पक्षशिस्तीचा आदर्श नमुना सुर्यकांत वाघमारे यांनी घालून दिला आहे. अनेक पदाधिकारी एकाच पदावर अनेक वर्षे जागा अडवुन राहतात. पदाला चिकटून राहतात. पदाचा कालावधी संपला तरीही पद सोडत नाहीत. अशा काळात सुर्यकांत वाघमारे यांनी पक्षाने आपल्याला ठरवुन दिलेला कालावधी पुर्ण झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाचा स्वतः राजीनामा देवून एक आदर्श घडवला आहे. सुर्यकांत वाघमारे यांचे शिस्तबद्ध काम आणि यशस्वी कामगिरी पाहुन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी सुर्यकांत वाघमारे यांची रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती केली आहे तसेच त्याचवेळी रिपब्लिकन पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी सातारा जिल्हयाचे अशोक गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे असे रिपब्लिकन पक्षा प्रसिध्दी प्रमुख हेमंत रणपिसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.




