२४ एप्रिल सायंकाळी सहा वाजता कार्ला फाटा येथे १६ जोडप्यांचा विवाहसोहळा होणार संपन्न

मावळ मराठा न्यूज ,लोणावळा : श्री एकवीरा देवी, दुर्गा परमेश्वरी, जोगेश्वरी सामुदायिक विवाहसोहळा हा येत्या सोमवारी २४ एप्रिल सायंकाळी सहा वाजता श्री दुर्गा परमेश्वरी मंदिर प्रांगण, मुंबई- पुणे हायवे शेजारी, कार्ला फाटा येथे होणार आहे. सोहळ्याचे यंदा अकरावे वर्ष असून, १६ जोडप्यांचा सामुदायिक विवाह याठिकाणी पार पडणार आहे.विवाहसोहळ्यावर वारेमाफ खर्च केला जातो. हा अनावश्यक खर्च टाळण्यासाठी कार्ला परिसरातील प्रमुख मंडळींनी पुढाकार घेतला आहे. नागरिकांनी लग्नसोहळ्यांसाठी होणारा अनावश्यक खर्च टाळावा व सामुदायिक विवाहसोहळ्यात मुलांची लग्न करावीत, असे आवाहन सोहळा समितीच्या बैठकीत करण्यात आले आहे. कार्ला पंचक्रोशीतील वधू-वरांना या सोहळ्यात प्राधान्यक्रम दिला जाणार आहे. हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये अतिशय देखण्या स्वरूपात हा विवाहसोहळा आयोजीत करण्यात येतो.मावळ तालुक्यातील शाही सामुदायिक विवाह सोहळा म्हणून कार्ला येथील सोहळ्याकडे पाहिले जाते. किमान दहा हजारांच्या आसपास नागरिक या सोहळ्याला उपस्थिती लावतात.कार्ला फाटा येथील दुर्गा परमेश्वरी मंदिराच्या प्रांगणात हा सोहळा होणार आहे. या विवाह सोहळ्याची विशेष बाब म्हणजे या विवाहसोहळ्यात लग्न कार्ला पंचक्रोशी तील वधू-वरांना प्राधान्य दिले जाते. प्रत्येक वधूस एक तोळा सोन्याचे मंगळसूत्र, पायातील पैंजण, जोडवी, लग्नाची साडी व कन्यादान म्हणून पाच भांडी देण्यात येतात. त्यासोबतच साखरपुड्यासाठी वरास लागणारे ड्रेस, लग्नासाठी सूट व ब्लेझर, मनगटी घड्याळ, इस्त्री, पंखा, वधूस साड्या, नाकातील नथ देखील दिली जाते.हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये देखण्या स्वरूपात हा विवाहसोहळा होत असतो. नागरिकांनी लग्नसोहळ्यांसाठी होणारा अनावश्यक खर्च टाळावा व सामुदायिक विवाहसोहळ्यात मुलांची लग्न करावीत, असे आवाहन सोहळा समितीच्या बैठकीत करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील नागरिकांनी या सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वरांना शुभाशीर्वाद द्यावेत, अशी विनंती विवाहसोहळा समितीकडून करण्यात आली आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page