लायन्स क्लब लोणावळा सुप्रीमोजच्या वतीने बी एन पुरंदरे हायस्कूल वर्गखोल्या व सभागृहाचे सुशोभीकरण

मावळ मराठा न्युज:- लोणावळा, दि १८एप्रिल २०२४ लायन्स क्लब लोणावळा सुप्रीमो वतीने प्रांतपाल भेटी निमित्त बी एन पुरंदरे हायस्कूल येथील दोन वर्गखोल्या व सभागृहाचे नूतनीकरण केलेल्या कामाचे उद्घाटन प्रांतपाल एम जे एफ लायन विजय भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डिस्ट्रिक्ट सी ई ओ लायन शाम खंडेलवाल, कॅबिनेट सेक्रेटरी अशोक मिस्त्री, कॅबिनेट ट्रेजरर राजेंद्र गोयल मुख्याध्यापक श्री आनंद गावडे व सहकारी आदी मान्यवर उपस्थित होते. वर्गखोल्या करिता लायन अमीन वाडीवाला व लायन गिरीश पारख तसेच सभागृह नूतनीकरण कामासाठी लायन सुधीर कदम व सुप्रीमो सहकाऱ्यांचे सहाय्य लाभले.हॉटेल चंद्रलोक येथे आयोजित सर्व साधारण सभेत अध्यक्ष लायन जयराम लिंगे गौडा यांनी मान्यवरांचे स्वागत केले तसेच क्लबच्या कार्याचा अहवाल सादर केला. सेक्रेटरी रिपोर्ट लायन धिरेंद्र चौकीकर तर ट्रेजराररिपोर्ट लायन सुरेया वाडीवाला यांनी सादर केला. लिओ प्रांजल कदम द्वारा ध्वज वंदन तसेच लिओ वैष्णवी वर्तक यांनी प्रांतपाल परिचय करुन दिला. प्रांतपाल एम जे एफ विजय भंडारी यांनी क्लबच्या कार्याचा गौरव केला. याप्रसंगी प्रेसिडेंट जयराम लिंगे गौडा, सेक्रेटरी धिरेंद्र चौकीकर, ट्रेजरार सचिन कुटे तसेच कॅबिनेट ऑफिसर लायन अमीन वाडीवाला, सुरेया वाडीवाला, गिरीष पारख, सुधीर कदम तसेच सुप्रीमो उदय शेट्टी, पल्लवी शेट्टी, विश्वनाथ पुत्तोल, साक्षी माळी, जिषान सय्यद आदी सदस्यांना सन्मानीत करण्यात आले.कार्यक्रमासाठी लायन विद्या लिंगे गौडा, नमिता कदम, छाया माळी, छाया वर्तक, चंद्रकांत माळी, प्रसंजित देव, विजय मानकर, किरण मानकर, ज्योती पारख आदी सदस्यांनी यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले. कार्यक्रमांचे सूत्र संचालन लायन अमीन वाडीवाला व रंजना पुट्टोल यांनी केले. डी जी विसित चैर पर्सन लायन गिरीष पारख यांनी आभाप्रदर्शन केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page