आय पी एस सत्य साई कार्तिक यांनी टायगर पॉइंट येथील ८ विनापरवाना टपरी व्यावसायिक यांचेवर कारवाई

मावळ मराठा न्यूज :-लोणावळा,सत्य साई कार्तिक आणि लोणावळा ग्रामीण पोलीस यांची आतवण टायगर पॉइंट येथे वेळेचे बंधन न पाळणाऱ्या आठ विनापरवाना टपरी धारक व्यावसायिकावर केली कारवाई. सदर कारवाई ही दिनांक २३ एप्रिल रोजी पहाटे ४ च्या सुमारास करण्यात आली. लोणावळा उप विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक आय पी एस सत्य साई कार्तिक आणि लोणावळा ग्रामीण पोलीस यांच्या संयुक्तीक रित्या सदर कारवाई करण्यात आली. पहाटे चार वाजता आतवन टायगर पॉइंट या पर्यटन स्थळी काही बिना परवाना टपरी व्यावसायिक वेळेचे बंधन न पाळल्याचे आढळून आल्याने त्यांचेवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३३ नुसार कारवाई करण्यात आली.यापुढे वेळेचे बंधन पाळून व्यवसाय करावा ,सकाळी सात ते रात्री सात या वेळातच आपला व्यवसाय करावा आणि पर्यटकांनी देखील येथे सायंकाळी सात नंतर जावू नये असे आवाहन केले. ही कारवाई आय पी एस सत्य साई कार्तिक त्यांच्या पथकातील सुभाष शिंदे,लोणावळा ग्रामीण चे सहायक पोलीस निरीक्षक निलेश माने,केतन तळपे, मच्छीद्र पानसरे, प्रणय कुमार उकिरडे यांनी केली

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page