शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त लायन्स पॉइंट व शिवलिंग पॉइंट येथे स्वच्छता मोहीम नि वृक्षारोपण



मावळ मराठा न्युज :-लोणावळा,शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त लोणावळ्यातील जगप्रसिद्ध लायन्स पॉइंट व शिवलिंग पॉइंट येथे सालाबाद प्रमाणे स्वच्छता मोहीम राबवत प्लास्टिक ,कचरा गोळा करण्यात आला. परिसरात वड,पिंपळ ,बदाम,पळस आदी वृक्ष लावून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.पुणे जिल्हा संघटक माजी जिल्हा प्रमुख श्री मच्छिंद्र खराडे,माजी उप सरपंच श्री शाम बाबू वाल्मिकी माजी विभाग प्रमुख श्री सुनिल इंगुळकर, श्री मनोज सावंत, युवा सेनचे श्री अजय ढम, सतीश गोणते, तेजस खराडे, योगेश जाधव, स्थानिक दुकानदार श्री सनी साळुंखे, भीमा शिंगाडे, सुनिल कदम, इंदर, चोबेजी ,पांडुरंग आखाडे,योगेश येवले, दत्ता साळुंखे,आदी मान्यवर उपस्थित होते.




