लोणावळ्याच्या माजी नगरसेविका अपर्णा बुटाला आणि जेष्ठ दाम्पत्य रांगणे यांचे घर फसवणूक प्रकरण; सुरेखा जाधव राजकीय रंग देत आहेत,ऍड पूजा बुटाला यांनी सर्व आरोप फेटाळले






मावळ मराठा न्युज-लोणावळा – घरावर ४ लाख कर्ज घ्यायचा बहाण्याने खरेदी खत करून घेऊन २० लाखाचे घर लोणावळ्यातील माजी नगरसेविका अपर्णा बुटाला यांनी त्यांच्या वकील मुलगी पूजा बुटाला यांच्या मदतीने बळकवले असा आरोप भांगरवाडी येथील रांगणे दाम्पत्याने एम एन न्युजशी बोलताना केला आहे. लोणावळा परिषदेत कर भरायला गेले असता घर बुटाला यांच्या नावावर झाल्याचे दिसून आले. मला न्याय मिळाला नाही तर मी आमरण उपोषणाला बसेल असेही रांगणे यांनी सांगितले.घर माझेच मालकीचे असताना मीच ६ हजार भाडे का द्यायचं असा संतप्त सवाल- सौ ज्योती रांगणे यांनी केला आहे.रांगणे दाम्पत्य दोन्हीही अपंग असल्याने त्यांच्या मागे त्यांना न्याय मिळे पर्यंत आम्ही पूर्ण ताकत लावू त्यासाठी उपोषण,आंदोलन करावे लागले तरी आम्ही त्यांचा सोबत आहोत असा विश्वास माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी त्यांच्या घरी जाऊन रांगणे कुटुंबियांची आपल्या कार्यकर्त्यांसह भेट घेवून दिला.बुटाला यांची मुलगी पूजा ही वकील असल्याने तिनेच ही सर्व कागदोपत्री फसवणूक केली असल्याचा आरोप सुरेखा जाधव यांनी केला आहे.तसेच लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सचिन पाटील हे देखील हे प्रकरण गेली दोन महिने तपास करण्याचा च्या नावाखाली दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप सुरेखा जाधव यांनी केला आहे. एकदोन दिवसातच सर्व सामान्य माणसाला सदर व्यवहार खरा की खोटा कळू शकतो पण पोलीस निरीक्षक असलेल्या सचिन पाटील यांना एवढा वेळ का लागला. दोन्ही ही अपंग आहेत याचे भान ठेवा. कुठे फेडाल हे पाप असा सवाल देखील जाधव यांनी केला. सात लाख रुपये शर्मिला तलाटी आणि ७ लाख कावेरी सोनावणे यांचे नावावर दाखवून त्याचे कडून १४ लाख रुपये वळते करून घेतल्याचे देखील जाधव यांनी साप्ताहिक मावळ नागरिक शी बोलताना सांगितले.

ऍड पूजा बुटाला
ऍड पूजा बुटाला यांना सदर प्रकरणा बाबत प्रतिक्रिया विचारली असता सदर फ्लॅट कोणत्याही प्रकारे फसवणूक करून घेतलेला नाही.सदर तक्रारी अर्ज सौ रांगणे यांनी पोलिसांना दिला होता,सबब तक्रारी अर्जावर लोणावळा शहर पोलिसांनी सखोल चौकशी करून प्रत्येकाचे जाब जबाब घेऊन तो अर्ज निकाली काढला असून त्यात रांगणे यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक झाली नसून सौ बुटाला यांच्या विरुद्ध कोणताही गुन्हा सिद्ध होत नाही.तसेच सदर प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने दोन्ही पक्षांनी न्यायालयात दाद मागावी असे सांगून तक्रार अर्ज निकाली काढला आहे.पोलिसांनी यातील सौ सोनवणे आणि तलाठी यांना चौकशीसाठी बोलावून बँक खात्याची पडताळणी केली.सदर प्रकरणात सौ ज्योती रांगणे यांचे विरुद्ध सौ अपर्णा बुटाला यांनी कोर्टात दावा दाखल केल्याने सदर प्रकरण कोर्टात सुरु आहे.सदर प्रकरणात सुरेखा जाधव या या वयक्तिक व्यवहाराला राजकीय रंग देऊन राजकीय दबाव आणून बुटाला आणि जाधव यांच्यात असलेले राजकीय मतभेद मनात ठेवून वैमनस्य काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.सौ ज्योती रांगणे धादांत खोटे बोलत असून कोर्टात जाणार नाही असे सांगून कोर्टात हजर पण राहत आहेत असेही ऍड पूजा बुटाला यांनी मावळ मराठा न्युज शी बोलताना सांगितले. सुरेखा जाधव देखील खोटे आरोप करत असून मी वकील ची सनद त्यावेळी घेतलीही नव्हती तर मी खरेदी खताचे कागद पत्र कसे तयार करणार असाही सवाल पूजा बुटाला यांनी मावळ मराठा न्युज शी बोलताना केला.



