नवभारत इंडिया तर्फे इंडियाचा हेल्थकेअर मध्ये अजून काय नवीन करावे? यावर चर्चेसाठी लोणावळ्यातील डॉ हेमंत अग्रवाल यांची महत्वाची भूमिका







मावळ मराठा न्युज – लोणावळा,२९ जुलै रोजी नवभारत इंडिया तर्फे india पॅनल डॉक्टरला बोलावलं गेलं होतं. त्यात main panels मध्ये सीईओ ऑफ लीलावती हॉस्पिटल. CEO off कोकिलाबेन हॉस्पिटल. CEO ऑफ मुंबई हॉस्पिटल,अंबानी हॉस्पिटल असे जवळजवळ टॉप दहा हॉस्पिटलचे सीईओ आमंत्रित केले गेले होते. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे यश हॉस्पिटल लोणावळ्याचे सीईओ. डॉक्टर हेमंत अग्रवाल यांनाही आमंत्रित केले गेले होते. यात विषय होता इंडियाचा हेल्थकेअर मध्ये अजून काय नवीन करावे आणि बाहेरच्या देशातील रुग्ण भारतात कसं जास्त येतील. यावर पॅनल डिस्कशन करण्यात आलं. डॉक्टर हेमंत अग्रवाल यांनी त्यांचे दोन नवीन प्रोजेक्ट मांडले. त्यात एक Dna ब्ल्यू प्रिंट. आणि दूसरा प्लांट्स स्टॅम्पल थेरेपी. सर्व पॅनालिस तर्फे अतिशय उत्सुकता दाखवण्यात आली. १५ डॉक्टरांना त्यांच्या कार्याबद्दल. नवभारतर्फे पारितोषिक देण्यात आले. मावळ मधले यश हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर हेमंत अग्रवाल यांनाही पारितोषिक देण्यात आले. डॉक्टर हेमंत अग्रवाल यांचा हा जो नवीन उपक्रम आहे, त्याला भारतामध्येच नाही तर विविध देशात मागणी आहे. यापूर्वी त्यांना Almaty मध्ये अमृता फडणवीस यांच्या हस्ते. आणि. स्वित्झर्लंड मधल्या Davas मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता आणि हे आपल्या मावळ वासियांसाठी मोठ्या अभिमानाची बाब आहे.त्यांच्या ह्या जागतिक स्वरूपाच्या कार्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि साप्ताहिक मावळ नागरिक,एम एन न्यूज आणि मावळ मराठा न्युज परिवाराच्या वतीने त्याना पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.



