लोणावळ्यात एक मे निमित्त ध्वजारोहण आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन


मावळ मराठा न्यूज,लोणावळा:- लोणावळा उपविभागीय पोलिसअधिक्षक कार्यालयासमोर आयपीएस पोलिसअधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी तर लोणावळा नगरपरिषद कार्यालयासमोर मुख्याधिकारी पंडित पाटील यांचेकडून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आधिकारी व माजी नगरसेवक , माजी नगरसेविका आदी मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी छञपती शिवाजीमहाराज अश्वारूढ पुतळ्यास तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , महात्मा फुले , संत गाडगेमहाराज , आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी सर्व महापुरूषांचे पुतळ्यास आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती तर लोणावळा शहर मनसे यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे देखील आयोजन करण्यात आले.रक्तदान शिबिराचे उद्घाटन मुख्यअधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी पंडित पाटील,लोणावळा शहर पोलिस निरिक्षक सिताराम डुबल आणि मनसे शहराध्यक्ष भारत चिकणे आणि मन सैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.तर राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शहर यांच्या वतीने १ मे कामगार दिन निमित्त ध्वजारोहण करून लोणावळा शहरातील हमाल, कामगारांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी शहर अध्यक्ष विलास बडेकर,अरविंद भाई मेहता,अरोही तळेगांवकर,नारायण पाळेकर,साहेबराव टकले,संयोगिता साबळे, फिरोज भाई,झाकीर खलीपा, महिला अध्यक्षा उमा मेहता उपस्थित होते.




